MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस व इतर वैयक्तिक कार्यक्रम साजरे न करण्याबाबत.. परिपत्रक दिनांक 25.06.2025

शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस व इतर वैयक्तिक कार्यक्रम साजरे न करण्याबाबत.. परिपत्रक दिनांक 25.06.2025


शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस व इतर वैयक्तिक कार्यक्रम साजरे न करण्याबाबत.. परिपत्रक दिनांक 25.06.2025

परिपत्रक 
कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ उदा. वाढदिवस birthday साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जावून कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत, नागरिक यांना त्यांचे कामासाठी तिष्ठत राहावे लागते. अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करणेची बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार उचित नाही.
त्यामुळे याद्वारे निर्देश देण्यात येतात की, यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे अधिकारी वा कर्मचारी यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ कार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्या अधिकारी/ कर्मचारी यांना त्यांचे नियंत्रण अधिकारी यांनी तात्काळ समज द्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा अनुचित बाबी यापुढे घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी

जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
 

Post a Comment

0 Comments