दळी वनजमीन ही महाराष्ट्रातील, विशेषतः रायगड जिल्ह्यातील, वनजमिनीचा एक प्रकार आहे. इंग्रज सरकारने आदिवासींच्या उपजीविकेसाठी ही वनजमीन सामूहिकपणे वाडींना दिली होती. या जमिनींच्या नोंदी 'दळीबुक' नावाच्या दप्तरी ठेवल्या जात होत्या
दळीबुक:
या वनजमिनींच्या नोंदी 'दळीबुक' नावाच्या रेकॉर्डमध्ये ठेवल्या जात होत्या, ज्यामध्ये वनजमिनीचे मालक आणि क्षेत्रफळाचा तपशील असायचा.
दळीनाईक:
दळीनाईक नावाच्या व्यक्तीकडे दळीबुक असायचे, आणि तो कसणाऱ्यांकडून ठराविक रक्कम (धारा) वसूल करून सरकारजमा करत असे
दळी वनजमीन आणि एकसाली वनजमीन (Eksali Land) मधील फरक:
दळी वनजमीन:
आदिवासींच्या उपजीविकेसाठी सामूहिकपणे वाडींना दिलेली वनजमीन.
एकसाली वनजमीन:
आदिवासींच्या उपजीविकेसाठी वैयक्तिक लागवडीसाठी दिलेली वन जमीन
दळीबुक मध्ये दळीधारकांसाठी अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे
१. सोबतचे परिशिष्टांत वर्णन केलेली व नकाशात दाखविलेली वनक्षेत्रातील जमीन तुम्हास लागवडीकरीता सालोसाल एक वर्षाने कराराने खाली लिहिलेल्या शर्तीवर देण्यात आली आहे. वरील लागवड या शब्दाचा अर्थ तुमचे जवळ नांगर नसेल तर तुम्ही कुदळीने जमीन उखळुन लागवड करण्याची आहे. असा समजण्याचा आहे.
२. ही वनविभागाची जमिन वाटेल तेव्हा काढुन घेण्यास सरकार मुखत्यार आहे.
३. तुम्ही तुमचे वाडीवरील मुख्य इसमाचे मार्फत सोबतच्या परिशिष्टांत दाखल केलेल्या संबंध जमिनीच्या चालु सालच्या भर घाऱ्यादाखल रु. ४ नये पैसे १५ राउंड गार्ड अगर तलाठी याजकडे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्याचे आत देत जाये.
४. सुके लाकुड तयार करण्याकरीता कोणत्याही झाडास तुम्ही इजा करु नये
५. तुम्हास दळी लागवडीकरीता दिलेल्या जमिनीत छात्तीइतके उंचीचे ठिकाण ज्याची वेढ १२ इंच किंवा त्याहुन जास्त् आहे अशी २० झाडे दर एकरी तुम्ही कायमची राखुन ठेवली पाहिजेत. तसेच आंब्याची, फणसाची व मोहाची सर्व झाडे राखुन ठेवली पाहिजेत. बाकीची झाडे लागवडीसाठी जमीन साफ करण्याकरीता अथवा टाहाळाकरीता तोडण्यास मोकळीक आहे. परंतु सदर झाडांचे लाकुड विकण्याकरीता किंवा मोबदल्याकरीता कोणत्याही संबंधाने तुम्ही नेण्याचे नाही. सदर लाकुड फॉरेस्ट कामगारांचे स्वाधीन करावे. व त्यांनी त्याची व्यवस्था करावी.
६. हया परवानगी अन्वये जेव्हा राबासाठी टाहाळा तोडाल तेव्हा झाडांचे मुख्य् कोंब राखुन त्यांचे आजुबाजुच्या फांदया मात्र तुम्ही तोडण्याच्या आहेत. राबाकरीता तुम्हास टाहाळ सदोदित मिळावा म्हणुन दळीकरीता दिलेल्या जमिनीच्या ज्या भागांत लागवड नसेल त्यांत टाहाळास उपयोगी पडण्यासारख्या जातीच्या झाडांचे बी तुम्ही दरसाल पेरले पाहिजे.
७. तुम्हाला दिलेल्या जमिनीच्या हद्दनिशान्या तुम्ही मांगल्या रीतीने दुरुस्त् ठेवल्या पाहिजेत, व हद्दीच्या खुणा दिसण्यासाठी हद्दीवरील झाडी तोडुन साफ केली पाहिजे.
८. तुमच्या नजरेस योणाऱ्या सर्व फॉरेस्ट संबंधांचे गुन्हंयाची खबर वेळच्या वेळी देऊन व ते न होवु देण्याकरीता तुमच्याकडुन होईल तितका इलाज करुन तुम्ही सरकारी जंगलाचे रक्षणाकरीता जंगलाकडील गार्डाना व पाटलाला मदत केली पाहिजे. मुख्यत्वेकरुन् तुम्ही गार्डास व पाटलास वणव्याची वर्दी दिली पाहिजे आणि तो विझवण्याचे कामी मदत केली पाहिजे.
९. तुम्हापैकी कोणासही आपले घर आपले स्वत्: ये सोईकरीता वाडीवरील गुख्य् इसमाचे परवानगीने तुमच्या मंडळीस जी जमीन देण्यात आली आहे तिच्या कोणत्याही भागात नेण्यास हरकत नाही. परंतु त्या जमिनीचे बाहेरील जंगलाचे इतर भागांत मात्र नेऊ नये.
१०. तुम्हास आपली जमीन पोटकुळाला लागवडीस देण्याचा अधिकार नाही. ही जमिन सरकारने फक्त तुम्हास दिली आहे. त्यांत दुसऱ्या कोणाला लागवडकरु देण्याची नाही. ही आमची वहिवाटीची जमिन असे, ही किंवा दुसरी कोणती तरी सबब सांगुन कोणी तुमच्यापासुन फी किंवा मक्ता मागेल किंवा तुम्हास कोणी फी किंवा मक्ता देण्यास सांगेल तर त्याबद्दल तुम्ही राउंड गार्ड अगर तलाठी यांस सांगावे. अशी फी किंवा मक्ता घेण्यास कोणासही अधिकार नाही.
११. हल्ली जी जमिन तुम्हाला लागवडीसाठी फारेस्टात दिली आहे त्यापेक्षा अधिक जमीन कधीही नाही परंतु जोपर्यंत तुम्ही धारा वक्तशीर देत जाल आणि सदरील सर्व नियमांप्रमाणे वर्तन करी तोपर्यंत हल्ली दिलेली जमिन तुमच्या ताब्यात सरकारच्या पसंतीप्रमाणे सालोसाल ठेवली जाईल.
१२. जर तुमच्यापैकी एखादा इसम मयत झाला तर त्याचे नजिकचे सरळ वारसांचे नाव हया पासबुकांत दाखल केले जाईल, आणि सदरहु वारस आणि त्याचे कुटुंबातील मनुष्ये ही मयत इसमाचे आणि त्याच्या कुटुंबाचे ठिकाणी आहेत असे समजले जाईल.
१३. तुम्हापैकी कोणी जर कधी वर लिहिलेल्या नियमांविरुध्द वर्तन करील अगर नेमुन दिलेल्या जागेतील लागवडीबद्दल इतर लोकांपासुन फीचा वसुल करण्याचा प्रयत्न् करील अगर सोबतच्या परिशिष्टात दाखविलेल्या जमिनीखेरीज फॉरेस्टांतील इतर जमिनीत लागवड करील तर त्याला नेमुन दिलेल्या जागेतुन एकदम काढुन लाविला जाईल व असा इसम एखादया कुटुंबाचा मुख्य म्हणुन जर नोंदला गेला असेल तर त्याचेबरोबर त्याचे कुटुंबातील सर्व माणसांनाही काढुन लाविले जाईल व त्यास कधीही परत घेतले जाणार नाही. शिवाय नेमुण दिलेल्या जागेत लागवड करण्याचा त्याचा हक्क कायमप्रमाणे सरकार-खालसा करण्यात येईल. व सदरहु अपराधी मनुष्य कुटुंबाचा मुख्य् म्हणुन दाखल असल्यास तो व त्याचे कुटुंबातील सर्व माणसे सदरप्रमाणे सदरहू हक्कास मुकतील.
१४. तुम्हास नेमुन दिलेल्या जागेत राहण्यासाठी घर बांधण्यास किंवा तुमच्या गुरांसाठी वाडे बांधण्यास किंवा लागवडीचे कामी बांध घालण्यास किंवा कुंपण करण्यास तुम्हास मोकळीक आहे. व तुम्ही पाहिजे तर फळझाडे ही लावावी. परंतु नेगुण दिलेल्या जागेबाहेर फॉरेस्टांत वरीलपैकी कोणतीही गोष्ट तुम्हास करण्याची मनाई आहे. फॉरेस्टच्या उघड्या भागांत वेळोवेळी अमलांत असलेल्या गुरे चारण्याच्या नियमास
अनुसरुन तुम्ही आपली गुरे चारावी. परंतु फॉरेस्टात बकरी चारण्यास किंवा नेमुण दिलेल्या भागांत ती ठेवण्यास तुम्हास मनाई आहे.
१४- अ पुर्वीचा वाटेचा हक्क असल्याठिकाणी तुम्हास नेमुन दिलेल्या जागांपैकी पीक नसलेल्या कोणत्याही भागी गुरांस किंवा गावकरी लोकारा जाण्यास तुम्ही मनाई करता कामा नये.
१५ वर लिहिल्याप्रमाणे ज्या सवलती तुम्हाला देण्याच्या आहेत त्या तुम्ही एक सालचा पट्टा घेतल्याने त्याच साली मिळकती व पट्टा देण्यात येईपर्यंत त्या साली फॉरेस्टमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हक्क नाही. पट्टयाची मुदत मार्गशिर्ष शुध्द पौर्णिमेला संपणारे सालची आहे. आणि जुन्या सालच्या पट्टयांअन्वये झालेल्या सर्व आकाराचा फडशा होईपर्यंत नवीन पट्टा दिला जाणार नाही. धारा देण्यापुर्वी तुम्ही टाहाळ तोडाल अगर दुसरी काही लागवडीची तयारी कराल तर तुम्ही नेमुण दिलेल्या जागेतुन कावुन लाविले जाण्यास पात्र व्हाल व सदरहु जागेत लागवड करण्याच्या हक्कास मुकाल.
१६. कायदेकानुस अनुसरुन जोपर्यंत तुम्ही आपले वतन ठेवाल, तोपर्यंत फॉरेस्टच्या उघड्या भागांत ज्या सवलतींचा उपभोग घेण्याची तुमची आजपर्यंत पात्रता मानली जात आहे त्या सर्व सवलतींचा उपभोग तुम्हास यापुढे घेता येईल.
0 Comments