शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे राखीव वनक्षेत्रात आग लागण्याच्या काल्पनिक घटनेच्या अनुषंगाने तयार केलेली कागदपत्रे
नमस्कार मी, सागर वाकचौरे, वनरक्षक आपणास याबाबत कळवितो की, शेतकऱ्याच्या किंवा त्यांचे मजुरांच्या निष्काळजीपणामुळे शेतात लावलेली आग वनक्षेत्रात पसरून वनसंपत्तीचे नुकसान होण्याच्या काल्पनिक घटनेच्या संदर्भात, वन अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेचे प्राथमिक दस्तऐवज मी तयार केले आहेत. हे दस्तऐवज वन अपराध तपासाच्या प्रक्रियेत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी सहकारी कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरावेत यासाठी काळजीपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहेत.तयार केलेली कागदपत्रे: पाहण्यासाठी येथे क्लिक करा
1. घटनास्थळाचा नकाशा:
जळालेल्या क्षेत्राचा तपशीलवार कच्चा नकाशा, जी.पी.एस. निर्देशांक सह, राखीव वनक्षेत्र आणि शेताची सीमा दर्शवणारा.
2. घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ:
जळालेले वनक्षेत्र, आरोपीच्या शेतातील जळालेले अवशेष आणि पर्यावरणीय नुकसानीचे स्पष्ट दृश्य.
3. गाव नकाशावरील मालकी हद्द:
मौजे धामणगाव पाट येथील राखीव वनकक्ष क्रमांक 52 आणि आरोपीच्या शेताची मालकी हद्द दर्शवणारा नकाशा.
4. आरोपीचा जबाब:
श्री. रमेश विठ्ठल पाटील याचा दिनांक 20/06/2023 रोजी पंचांच्या समक्ष नोंदवलेला जबाब, ज्यामध्ये त्याने शेतात आग लावल्याची कबुली दिली.
5. घटनास्थळाचा पंचनामा:
माचिस आणि जळालेल्या गवत, झुडपांच्या अवशेषांची जप्ती तसेच घटनास्थळ पाहणीचा पंचनामा.
6. साक्षीदारांचे जबाब:
पंच श्री. बाबूराव जाधव आणि श्री. प्रकाश पाटील, स्थानिक नागरिक श्री. भागवत घुले यांचे जबाब.
7. वन कर्मचाऱ्यांचे जबाब:
वनपाल श्री. तळपाडे आणि वनमजूर श्री. दशरथ पारधी यांचे तपास आणि आग विझवण्याच्या प्रक्रियेबाबतचे जबाब.
8. नातेवाईकाचा जबाब:
आरोपीचे वडील श्री. विठ्ठल बापूराव पाटील यांचा जबाब, ज्यामध्ये तपास प्रक्रियेची पारदर्शकता आणि दबावमुक्त वातावरणाची पुष्टी.
9. प्रथम गुन्हा रिपोर्ट (FOR):
वन अपराध क्रमांक 09/2024, दिनांक 22/10/2024, भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६(१)(D), २६(१)(F) व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ (नियम 4 ते 6 )अंतर्गत नोंदवलेला por.
ही कागदपत्रे भारतीय वन अधिनियम १९२७, कलम ७२(१)(D) आणि भारतीय साक्ष कायदा 2023 च्या तरतुदींनुसार तयार केली असून, वन अपराध तपासाच्या कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणि सहकारी कर्मचाऱ्यांना माहितीसाठी उपयुक्त ठरतील. यामुळे भविष्यातील तपास प्रक्रियांमध्ये एकसमानता आणि कार्यक्षमता वाढू शकते.
सर्व दस्तऐवज डिजिटल स्वरूपात खालील सुरक्षित लिंकवर उपलब्ध आहेत:
सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी या कागदपत्रांचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपले अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात. यामुळे तपास प्रक्रियेत आणखीन काही सुधारणा करणे आणि अधिक प्रभावी कार्यवाहीसाठी कागदपत्रे तयार करणे शक्य होईल. कोणत्याही शंका किंवा मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधावा.
सागर वाकचौरे,वनरक्षक
0 Comments