राखीव वनक्षेत्रात लागलेल्या आगीनंतर आरोपी पसार झालेल्या घटनेच्या अनुषंगाने (काल्पनिक) या दस्तऐवजचा वापर आवश्यकतेप्रमाणे करण्याबाबत.
सदर माहिती आपणास कळविण्यात येत आहे की, वनगुन्हा तपास अधिक प्रभावीपणे पार पाडता यावा, तसेच नवीन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष घटनेप्रमाणे कागदपत्रे तयार करण्याचे आकलन व्हावे, यासाठी राखीव वनक्षेत्रात आग लागलेली असून, आरोपीने घटनास्थळावरून पलायन केलेला आहे व तो अद्याप मिळून आलेला नाही, अशा काल्पनिक स्वरूपातील घटनेवर आधारित दस्तऐवज मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Link 🖇️ 🔗
सदर घटना शेताच्या बांधावर किंवा वन हद्दीलगत नसून संपूर्णतः राखीव वनक्षेत्रात आत मध्ये घडलेली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, आजतागायत त्याचा शोध लागलेला नाही. सदर बाब लक्षात घेता, खालीलप्रमाणे दस्तऐवज तयार करण्यात आले आहेत: लिंक 🔗 🔗
1. घटनास्थळ नकाशा – आग लागलेल्या जागेचा अंदाजे नकाशा
2. घटनास्थळाचे छायाचित्रे / व्हिडिओ – आगीचे परिणाम दाखवणारे, जळालेल्या वनस्पतींचे व झुडपांचे फोटो.
3. साक्षीदार जबाब – वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांचे व मजुरांचे प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित नोंदविलेले जबाब.
4. वन कर्मचारी जबाब – आग विझवताना आलेले अनुभव, परिस्थितीचे वर्णन व संभाव्य आरोपीची माहिती.
5. पंचनामा – घटनास्थळी आढळलेले अवशेष (माचिसच्या काड्या, जळालेल्या वस्तू इ.) यांचे पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत केलेले पंचनामा विवरण.
6. तपास अहवाल – आरोपी सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.
7. प्राथमिक वनगुन्हा नोंद (FOR) – भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत नोंदवलेला.
8. गाव नकाशा – घटना संपूर्णपणे वनक्षेत्रात घडल्याचे पुराव्यादाखल म्हणून नकाशा.
वरील दस्तऐवजांचा उद्देश आगीच्या घटनांमध्ये मार्गदर्शन म्हणून आणि प्रत्यक्ष कारवाई करताना येणाऱ्या अडचणी, कायदेशीर पुराव्यांची साखळी व दस्तऐवज निर्मिती प्रक्रियेची पद्धत स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
सदर लिंक मधील कागदपत्रे सर्व क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी अभ्यासावे व आवश्यक त्या सुधारणा सुचवाव्यात, जेणेकरून भविष्यात प्रत्यक्ष घटनेवेळी दस्तऐवज बनवताना अधिक अचूकता व सुसंगती दिसून येऊ शकते.
दस्तऐवज संच लिंक:
https://drive.google.com/drive/folders/1b5021eLZ1sEA7Xw_qYfuCx8VoSZOMMRn
अधिक माहिती अथवा शंका असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
सागर वाकचौरे, वनरक्षक
Sagar Wakchaure Forest Guard
0 Comments