MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वनविभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात सक्षम प्राधिकारी घोषीत करण्याबाबत...शासन निर्णय दिनांक 14.05.2015

 वनविभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात सक्षम प्राधिकारी घोषीत करण्याबाबत... शासन निर्णय दिनांक 14.05.2015


महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतूदीनुसार वनविभागातील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांचे कलम ३ अंतर्गत सर्वसाधारण बदल्यांसाठी सक्षम प्राधिकारी शासन अधिसूचना दिनांक २३.०६.२०१४ व १४.०५.२०१५ अन्वये घोषित करण्यात आले आहे. तथापी विशेष कारणास्तव, बदली अधिनियमातील कलम ४(४) व ४(५) अंतर्गत गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सक्षम प्राधिकारी अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही. मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मुळ अर्ज क्र. ३९९/२०१७ (श्री. आर.एन. चव्हाण, वनपाल विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) मध्ये दिनांक ०९.१२.२०१७ च्या आदेशात विशेष कारणास्तव बदली करण्यास सक्षम प्राधिकारी घोषित केले आहेत किंवा कसे, हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास अनुलक्षुन विशेष अपवादात्मक परिस्थितीत, बदली अधिनियमातील कलम ४(४) व ४ (५) अंतर्गत गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१) मधील कलम ६ खालील दुसऱ्या परंतुकानुसार वन विभागाच्या कार्यकक्षेतील क्षेत्रीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी खालीलप्रमाणे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments