MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

कांदळवन कक्षांतर्गत कांदळवन विभाग- उत्तर कोकण आणि कांदळवन विभाग- दक्षिण कोकण विभाग निर्मिती व त्याअंतर्गत वनपरिक्षेत्र, वन परिमंडळ व नियतक्षेत्राची पुनर्रचना करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 02.08.2024

 कांदळवन कक्षांतर्गत कांदळवन विभाग- उत्तर कोकण आणि कांदळवन विभाग- दक्षिण कोकण विभाग निर्मिती व त्याअंतर्गत वनपरिक्षेत्र, वन परिमंडळ व नियतक्षेत्राची पुनर्रचना करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 02.08.2024


सद्यस्थितीतील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्हयातील मुंबई कांदळवन संधारण घटकाच्या कांदळवन क्षेत्रासहीत पालघर जिल्हयातील शासकीय विभाग तसेच प्रादेशिक वन विभागांकडील कांदळवन क्षेत्राचा समावेश करण्यात येऊन "कांदळवन विभाग उत्तर कोकण असा विभाग निर्माण करण्यात येत आहे. सदर विभागाचे मुख्यालय "ठाणे" असेल.
त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीमधील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील सद्यस्थितीत कांदळवन कक्षाकडील वनक्षेत्रासह प्रादेशिक वन विभागांकडील कांदळवन क्षेत्रांचा व इतर शासकीय कांदळवन क्षेत्रांचा समावेश करण्यात येऊन "कांदळवन विभाग- दक्षिण कोकण" असा विभाग निर्माण
करण्यात येत आहे. सदर विभागाचे मुख्यालय "अलिबाग (जि. रायगड)" असेल.
कांदळवन विभाग- उत्तर कोकण आणि कांदळवन विभाग दक्षिण कोकण हे दोन्ही विभाग मुख्य वनसंरक्षक, (श्रेणीवाढ- अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक), कांदळवन कक्ष, मुंबई यांच्या अधिनस्त कार्यरत राहतील.

कांदळवन नियतक्षेत्र  पुनर्रचना | कांदळवन बीट पुनर्रचना | कांदळवन वन परिमंडळ  पुनर्रचना |कांदळवन वनक्षेत्र  पुनर्रचना | 








Post a Comment

0 Comments