MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

सर्प मित्रां करीता मार्गदर्शक सुचना

सर्प मित्रां करीता मार्गदर्शक सुचना


सर्प मित्रां करीता मार्गदर्शक सुचना | साप मित्र ओळखपत्र | सर्प मित्र ओळखपत्र|


सर्प मित्रां करीता मार्गदर्शक सुचना


१ वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ११ (ब) अंतर्गत तरतुदी नुसार मानवी जीवीतास व मालमत्तेस धोकादायक ठरणा-या अनुसूची २ ते ४ मधील सर्वांना पकडणे व कलम ३९(३) नुसार ताब्यात घेवून वनक्षेत्रात मुक्त करणे करीता परवाना धारकास सदर ओळखपत्र देण्यात येत आहे.

२. सदर परवाना स्थानक वन विभाग कार्यालया अंतर्गत कार्यक्षेत्रात जारी केल्याच्या तारखे पासून एक वर्ष पर्यंत लागु राहील.

३. सदर कामात जि वास धोका संभवत असल्याने सर्प मित्रांनी योग्य रकमेचा व्यक्ती गत आयुर्विमा करण्याचे सूचविण्यात येत आहे.

४. सर्पमित्रांस विषारी व विनविषारी सापांचे तसेच सापाच्या विवीध प्रजातीचे स्थोल ज्ञान असावे तसेच त्यांना सापानी चावा घेतल्यास प्रथमोपचाराचे देखिल सखोल ज्ञान असणे अपेक्षित आहे.

५. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ११(ब) अंतर्गत परवान्यानुसार सर्पमित्राने पकडलेल्या सापांना जाहिर प्रदर्शनासाठी ठेवू नये. तसे केल्यास त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (३९) चे व्याख्ये नुसार ते प्रदर्शन प्राणि संग्रहालय ठरेल व त्यास कलम ३८(H) नुसारकेन्द्रीय चिडियाघर प्राकिरणाची पुर्व परवानगी घेणे अनिवार्य ठरते. कायद्याचे उल्लंघन केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ५१ नुसर शिक्षेची कार्यवाही करण्यात येईल.

६. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ११ (ब) व कलम ३९ (२) व (३) चे अधिन पकडलेले, सापा बाबतची माहिती सर्पमित्राने संबंधित नजिकचे पोलीस ध्यास किंवा उपवनसंरक्षक किंवा वनविभागाचे उपवनसंरक्षक वनसंरक्षक यांना ४८ तासाचे आत देतील व त्यांचे निर्देशानुसार सापास त्याचे योग्य अधिवासात त्वरीत मुक्त करतील. 

७.  वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९(३) चे अधिन वरील प्रमाणे वनअधिका यांकडून प्रकरण परत्वे प्राप्त निर्देशाचे अधिन राहून सर्प मित्रांना तात्पुरत्या स्वरुपात निर्देशित ठिकाणी व कालावधीसाठी सर्प ताब्यात ठेवता येईल. 

८. पकडलेल्या सापापासून विष किंवा त्यांचे इतर अवयव काढता येणार नाही.

९. सर्प मित्रांनी साप पकडण्या पासून मुक्त करण्या पर्यंत शास्त्रोक्त पध्दतीचा उपयोग करावा.

१०. सर्प मित्रांनी फडलेल्या सापाची संपूर्ण माहिती विहित प्रपत्रात नोंदवहीत नोंदवावी. त्याच प्रमाणे योग्य अधिवासात सर्प सोडतांना त्या किाणाची माहिती देखील रजीस्टर मध्ये नोंद ठेवावी.

११. सर्पमित्राने पकडलेल्या सापाचा मासीक लेखा वनविगाचे विभागीय कार्यालयास सादर करावा.
 

Post a Comment

0 Comments