अयशस्वी रोपवनाच्या ठिकाणी पुन्हा रोपवन घेताना अंमलबजावणीबाबत विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करणेबाबत.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे दिनांक 06.02.2013 रोजीचे परिपत्रक
अयशस्वी रोपवनाच्या ठिकाणी नवीन लागवड घेण्याबाबत यापूर्वी १९७९ मध्ये तयार केलेले "A Note on Techniques and Cost Structures for Afforestation and Allied Schemes" मधील भाग ।। प्रकरण क्र. । याच परिच्छेद २.१.३ मध्ये प्रक्रीया सूचविण्यात आले होते.
या विषयावर मुख्य वनसंरक्षक (मुल्यांकन) यांचेशी चर्चा व तत्सम सर्वकष विचार करुन खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे:
१. अयशस्वी रोपवने नवीन लागवडीकरीता कार्यआयोजना मधील प्रस्तावित करण्यात आले असेल तर कार्यआयोजनेतील सूचनेप्रमाणे लागवडी घेण्यात यावी. गरज भासल्यास लागवडी जलद गतीने करण्याच्या उद्देशाने सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन लागवडीचे वर्ष अगोदर घेण्याबाबत कार्यवाही करावी.
२. जुने लागवड जर अंशतः अयशस्वी असेल तर त्याठिकाणी सहाय्यित नैसर्गिक पूर्ननिमितीच्या धरतीवर
क्षेत्र निहाय अंदाज पत्र तयार करुन सक्षम अधिकाऱ्यांचे तांत्रिक व प्रशासनिक मान्यता घेऊन लागवडीचे योजनेप्रमाणे निधी उपलब्ध असल्यास राबविण्यात यावे,
क्षेत्र निहाय अंदाज पत्र तयार करुन सक्षम अधिकाऱ्यांचे तांत्रिक व प्रशासनिक मान्यता घेऊन लागवडीचे योजनेप्रमाणे निधी उपलब्ध असल्यास राबविण्यात यावे,
३. अयशस्वी रोपवन १० वर्षपूर्वी असेल व लागवड पूर्णपणे अयशस्वी झाल असेल ता ठिकाण निहाय अंदाज पत्रक तयार करून सक्षम अधिकाऱ्यांचे तांत्रिक व प्रशासनिक मंजूरी घेऊन रोपवनाच्या योजनेनुसार निधी उपलब्धतेप्रमाणे लागवडीचे कार्यक्रम हाती घ्यावे. असे रोपवन करण्यापूर्वी उपवनसंरक्षकांनी पूर्वी घेण्यात आलेले लागवड कोणत्या कारणाने अयशस्वी झाले त्याचा कारणमिमांसा देऊन त्याठिकाणी नव्याने लागवड करण्याचे रितसर आदेश पारीत करावे. असे करतांना जुने लागवडीमधील चूका व त्रुटीची पुनरावृत्ती होऊन नये याची दक्षता घ्यावी. जुने लागवडमध्ये झालेल्या कामाच्या त्याच ठिकाणी नवीन लागवडमध्ये उपयोगी पडणार असेल अशा बाबी (उदाहरणार्थ TCM, दगडीभित इत्यादी) लागवडीचे नवीन अंदाज पत्रकात समावेश करु नये किंवा गरज भासत असल्यास जुने केलेले कामाच्या दूरुस्तीवर होणाऱ्या खर्चाचा अंदाज प समावेश करावे. अशा ठिकाणी उपचार नकाशे तयार करतांना बारकाईने योग्य प्रजाती उपचारमध्ये ताळमेळ घालून लागवडीसंबंधी कामे करणे अत्यंत आवश्यक आहे, ही बाब लक्षात आणून देत आहे.
४. ज्याठिकाणी पुर्णपणे अयशस्वी झालेले रोपवन ५ वर्षापेक्षा जास्त किंवा १० वर्षापेक्षा कमी कालावधीचे असेल त्याठिकाणी संबंधीत उपवसंरक्षकांनी सर्व माहितीसह नवीन लागवडी बाचत प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांना सादर करावे. मुख्य वनसंरक्षक यांनी कार्यआयोजना अधिकारी (वनसंरक्षक/मुख्य वनसंरक्षक) व विभागीय वन अधिकारी (मुल्यांकन) यांचेशी सल्ला मसलत करुन त्याबाबत योग्य ते निर्णय घ्यावे, त्यांनी मान्य केलेली कारणमिमांसा व लागू असलेले मार्गदर्शक तत्वे याचा समावेश करुन आदेश पारित करावे.
५. सध्या क्षेत्रीय कामामध्ये आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. लागवडी क्षेत्राचा GPS Polygon च Geo Tag छायाचित्र (GPS सोई असलेले कॅमेरातून काढण्यात आलेले फोटो) यांचा दस्तावेजीकरण (Regular Documentation) ठेवीत जावे.
६. पूर्णपणे व अंशतः अयशस्वी ठरलेले लागवडीचे ठिकाणी नवीन लागवड घेण्याचे पूर्वी असे जागेवरच वेगवेगळे भागातील Geo Tag छायाचित्राचा दस्तावेज मध्ये समावेश करावा.
७. जुने लागवडीच्या ठिकाणी नवीन लागवडी घेणे ही विशेष बाब आहे, याची जाणीव ठेवावी. अशा लागवडीचसाठी लागणारे विशेष देखरेख व मुल्यांकन ठेवण्याच्या उद्देशाने त्याचा कामाबाबत संबंधित उपवनसंरक्षक यांचे स्तरावर दस्तावेज व्यवस्थित ठेवावे, व त्याचा मुख्य वनसंरक्षकांनी नियमित आढावा घ्यावा.
८. वरीलप्रमाणे नवीन लागवड घेतांना लागू असलेले सर्व नियमातील सक्षम अधिकाऱ्यांचे परवानगी घेण्याची कार्यवाही उपवनसंरक्षक/मुख्य वनसंरक्षक यांनी करावी.
लागवडी करतांना त्याठिकाणचे विशेष परीस्थितीत उदाहरणार्थ त्या भागात मिळणारे दुर्मिळ वन्यजीव (पक्षी धरुन) व त्याठिकाणचे भौगोलिक परिस्थिती/इको सिसटम तसेच त्या जागेचा स्थानिक वापर या सर्व बाबीचा विचार करुन प्रजाती व लागवडीचे मॉडेल निवडण्यात यावे.

0 Comments