MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

शासकीय कर्मचा-याच्या सेवा पुस्तिकेत नोंदलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत.शासन निर्णय दिनांक 24.06.1992

 शासकीय कर्मचा-याच्या सेवा पुस्तिकेत नोंदलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत.शासन निर्णय दिनांक 24.06.1992


महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

 परिपत्रक क्र. जन्मदि १०९२/ प्र.क्र.४९-९२ / तेरा-अ, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : २४ जून, १९९२


शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सेवापुस्तकात नोंदलेल्या जन्मतारखेत फेरबदल करण्यासाठी, शासकीय कर्मचा-याने केलेले अर्ज संबंधित मंत्रालयीन विभाग तपासून सामान्य प्रशासन विभागाकडे व वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवितात.

यासंबंधात असे निदर्शनास आले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा [तेवेच्या सर्वसाधारण शर्ती] नियम १९८१ च्या नियम ३८ मध्ये नमूद केलेल्या पुराव्यानुसार अते प्रस्ताव न तपासता ते सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येतात.

सदर पुरावे मागविण्यासाठी / तपासण्यासाठी प्रकरण संबंधित मंत्रालयीन विभागास परत करावे लागते व यामुळे त्यावर निर्णय घेण्यास विलंब होतो. सदर कालापव्यय टाळण्यासाठी जन्मदिनांकातील दुरुस्तीबाबतचे प्रस्ताव तपासण्यासाठी एक तपासणीसूची तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.

याबाबत आता अते आदेश देण्यात येत आहेत की, शासकीय कर्मचा-याने त्याच्या सेवापुस्तिकेत नोंदण्यात आलेल्या जन्मदिनांकामध्ये दुरुस्ती करण्यासाठी दिलेला अर्ज सोबत जोडलेल्या तपासणीसूची नुसार तपासून आवश्यक प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागास सादर करावा की जेणेकरून उपरोक्त विभागांना या प्रस्तावाची छाननी महाराष्ट्र नागरी सेवा [सेवेच्या सर्वसाधारण वार्ता] नियम १९८१ च्या नियम ३८ प्रमाणे करुन योग्य तो निर्णय घेता येईल.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शासकीय कर्मचा-याच्या सेवापुस्तिकेत नोंदवलेल्या जन्मदिनांका मध्ये दुरुस्ती करण्याबाबतचे अर्ज तपासण्यासाठी तपासणीसूची.




Post a Comment

0 Comments