MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

NTPS पोर्टल मध्ये मॅपींग केलेले अधिकारी/कर्मचारी यांचे User ID Password activate करणे बाबत.....

 NTPS पोर्टल मध्ये मॅपींग केलेले अधिकारी/कर्मचारी यांचे User ID Password activate करणे बाबत.....


NTPS (National Transit Pass System

NTPS (National Transit Pass System

संपुर्ण देशात वन उपजांच्या निर्गतीसाठी आवश्यक वाहतूक परवाना जारी करण्याकरीता "एक राष्ट्र-एक पास" या तत्वावर केंद्र शासनाने NTPS (National Transit Pass System) ही प्रणाली विकसित केली आहे. तसेच महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ मध्ये अधिसूचना क्रमांक TRS-११/२०२१/C.R.३१५/F-६, दिनांक ०५/१०/२०२३ अन्वये राज्यात राष्ट्रीय ट्रान्सिट पास प्रणाली (NTPS) कार्यान्वित करण्याबाबत सुधारणा करण्यात आली आहे.

२.०० NTPS (National Transit Pass System) प्रणाली महाराष्ट्र राज्यात दिनांक १२/०६/२०२४ पासून लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने NTPS पोर्टलवर एकुण ८०८ अधिकारी/कर्मचा-यांची Mapping करण्यात आलेली असून त्यांना Login ID व password देण्यात आले आहे. सदर पोर्टलवर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी Login करावयाचे असून त्याचे mobile वर प्राप्त OTP share करून या पोर्टलवर activate करून घ्यावयाचे आहे. तथापी आज रोजी दिनांक २/७/२०२४ रोजी संदर्भिय क्र. १ नुसार प्राप्त संदेशानुसार ८०८ user पैकी फक्त २०४ user activate झाले असून अद्याप ६०४ user activate झालेले नाही.
३.०० मोठया प्रमाणावर अधिकारी/कर्मचारी NTPS पोर्टलवर Activate नसल्याने NTPS पोर्टलवर TP निर्गमित करण्यास अर्जदारास अडचण निर्माण होत आहे. तरी सर्व संबंधित ६०४ अधिकारी/कर्मचारी यांनी तात्काळ NTPS पोर्टलवर आपल्याला प्राप्त User ID व Password चा उपयोग करून रजिस्ट्रेशन करावे


Post a Comment

0 Comments