MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), पुणे हे कार्यालय चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्याबाबत...शासन निर्णय दिनांक 03.01.2024



विषय:- अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), पुणे हे कार्यालय चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्याबाबत...शासन निर्णय दिनांक 03.01.2024

प्रस्तावना :-
चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या अस्तित्वात असलेल्या पदानुसार व अकादमीच्या आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्यात आली आहे. यास्तव पुनर्रचेनेच्या आवश्यकतेनुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), पुणे हे कार्यालय चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्याची तसेच सदरहू कार्यालय स्थलांतरणामुळे पडणाऱ्या आर्थिक भारास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), पुणे हे कार्यालय चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे.
२. वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे अद्ययावत सुविधेसह प्रशस्त प्रशासकीय इमारत असल्याने सदर इमारतीत कार्यालय सुरु करण्यात यावे.
३. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), पुणे हे कार्यालय चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याने शासन निर्णय क्र. टिआरएफ-२०००/प्र.क्र.३/१२, साप्रवि, दि.०६.०८.२००२ नुसार चंद्रपूर येथे कार्यरत असणा-या कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ देय होणार आहे.
४. सदरहू कार्यालयाच्या स्थलांतरणामुळे भांडार साहित्य वाहतुक व अधिकारी/ कर्मचारी यांना बदली प्रवास भत्याच्या रकमेचा एकावेळेचा भार अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
५. तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), पुणे येथील अधिकारी/ कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ दिल्यामुळे अंदाजे रु.१०,६८,६००/- चा अधिकचा वार्षिक आर्थिक भारास तसेच कार्यालयातील दस्तऐवज, कार्यालयीन साहित्य इ. भांडार साहित्य वाहतुक करण्यासाठी एकावेळेचा आर्थिक भारास अंदाजे रु.४,९४,२००/- असे एकूण रु.१५,६२,८००/- इतक्या रक्कमेस याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
६. शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
७. सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारीक संदर्भ क्र.३०२/२०२३/व्यय १०, दि.०६.०९.२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०१०३१७५२५९२०१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

sd
(भगवान सावंत)
उप सचिव (वने) महाराष्ट्र शासन
 

Post a Comment

0 Comments