MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अन्वेषण ( investigation ) एक समावेशक प्रक्रिया

 अन्वेषण ( investigation ) एक समावेशक प्रक्रिया

राजेंद्र धोंगडे. सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक 

गेले कांही दिवस वन्यजीव ( संरक्षण) अधिनियम 1972 मधील कलम 50(1) आणि 50(8) चा संदर्भ देऊन गुन्ह्याच्या अन्वेषणाबाबत भिन्न प्रतिक्रिया गटावर आल्या आहेत. कांही निवृत्त स्वयंम घोषित तज्ञ वक्ते वन्यजीव तपासात वनरक्षक वनपाल यांचे काम नाही असे सांगून गैरसमज वाढविण्यास हातभार लावीत आहेत. ही भूमिका काम टाळू इच्छिणाऱ्या लोकांमध्ये खूप प्रिय होत आहे. माझ्या विधी विषयक कार्यशाळेत या मुद्द्यावर मी खुलासा करीत असतो व पुष्ट्यर्थ HC / SC सायटेशन टाकीत असतो. त्या आधारे माझे आकलन समोर ठेवीत आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 50(1) मध्ये a, b, c या उपकलमात विभागला असून अनुक्रमे वन्यप्राणी किंवा मृगया चिन्ह तपासणे व त्याबाबत ची कागदपत्रे तपासणे हे अधिकार (a) मध्ये आहेत.वाहन थांबविणे, शोध घेणे, परिसरात प्रवेश करून तपासणी करणे (b) मध्ये आहे. जप्ती आणि अटक करणे (c) मध्ये आहे.

वरील सर्व अधिकार any forest officer ला असून राज्याने वनरक्षक ते अपार प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव) यास जुलै 2013 च्या अधिसूचने द्वारे प्रदान केले आहेत.

दिनांक 26 जुलै 2013 ची अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वरील तिन्ही कामे ही अन्वेषण मध्ये येतात का ? या प्रश्नांचा मागोवा घेताना प्रथम CrPC मधील अन्वेषण ची व्याख्या विचारात घेऊ.

पुरावा गोळा करण्यासाठी CrPC मधील तरतुदी नुसार केलेली प्रक्रिया म्हणजे अन्वेषण (2(h). वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 50(1) मधील कामे ही पुरावा गोळा करण्यासाठी केलेली कामे नाहीत का ? या प्रश्नाचे उत्तर खालील 2 सायटेशन मध्ये स्पष्ट आहे.

Directorate of enforcement v deepak mahajan SC AIR 1775/ 1994 नुसार अन्वेषण ही समावेशक प्रक्रिया असून घटनास्थळी जाणे, घटनेची खात्री करून घेणे, मुद्देमाल शोधणे, जप्त करणे, अटक करणे, पुरावे गोळा करणे, जाब जवाब नोंदविणे, जागेची झडती घेणे ई ई. 

महाराष्ट्र राज्य वि यादव नथ्थूजी Mah LJ 562/2000 मध्ये अन्वेषण प्रक्रिया म्हणजे अटक , विचारपूस( interrogation) अशा सर्व स्टेप्स चा त्यात समावेश होतो.

तात्पर्य वन्यजीव गुन्हा अन्वेषणात वनरक्षक , वनपाल, वनक्षेत्रपाल यांची भूमिका आहेच परंतु ACF ते APCCF (wL) यांची वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 50(8) प्रमाणे विशेष भूमिका आहे.

राजेंद्र धोंगडे
सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक 


इतर पोस्ट

राजेंद्र धोंगडे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक यांच्या इतर पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 


Tag ##


राजेंद्र धोंगडे.सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक | Rajendra Dhongade Retd ACF


Post a Comment

0 Comments