प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव) , महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय,
क्रमांक : कक्ष- २३(४)/प्र.क्र. १२३ (२०२२-२३) / ३५०५ / २३-२४ दिनांक:- -२/११/२०२३.
प्रती
मुख्य वनसंरक्षक (प्रा), / वनसंरक्षक (प्रा), सर्व
क्षेत्र संचालक, व्याघ्र प्रकल्प (सर्व) उप वनसंरक्षक (वन्यजीव) सर्व
विषय:- मानव-वन्यजीव संर्घषामध्ये पशुहानीच्या प्रकरणा बाबत.
उपरोक्त विषयाक्ति प्रकरणी राज्यामध्ये मागील काही वर्षामध्ये मानव-वन्यजीव संपर्धाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. त्यात मनुष्यहानी पशुहानी व शेत पिक नुकसानी प्रकरणी प्रचिलत शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई दिली जाते.
दिनांक २३/८/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार वन्यप्राण्याव्दारे पशु मृत्यु प्रकरणामध्ये २. गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यु झाल्यास बाजार भाव किंमतीच्या ७५% किंवा ७०,०००/- यापैकी कमी असणारी रक्कम २. मेंढी, बकरी व इतर पशुधन याचा मृत्यु झाल्यास बाजार भाव किंमतीच्या ७५% किंवा १५,०००/- यापैकी कमी असणारी रक्कम नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.
पशुहानी प्रकरणीमध्ये असे दिसुन येते की, वन्यप्राण्याव्दारे पशु मृत्यु झाल्यास सदर पशुचे शव ठिकाणापासून इतरत्र हालविले जाते किंवा शव गावाकडे आणले जाते. त्यानंतर झालेल्या पशुहानीकरीता प्रचलित शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची मागणी केली जाते. तरी याव्दारे सर्व वनवृत्तांचे नियंत्रण अधिकारी यांना कळविण्यात येते की, पशु मृत्यु प्रकरणामध्ये
पशुचे शव ठिकाणापासून हलविण्यात येवु नये व मृत पशुचे शव हे पुर्णत: वन्यप्राण्यास खावू दयावे व त्यानंतरच सदर प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
तरी बाबतच्या सूचना आपले अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयास आपले स्तरावरुन कळविण्यात यावे व पाचायत योग्य ती व्यापक प्रसिध्दी करण्याची कार्यवाही करावी.
sd-
0 Comments