MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य KatePurna Wildlife Sanctuary

 

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य विषयी माहिती 

KatePurna Wildlife Sanctuary information in marathi 

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य ( KatePurna Wildlife Sanctuary ) हे अकोला जिल्ह्यातील समृध्द वन्यजीव अधिवास असलेले क्षेत्र आहे. महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी १९८८ .मध्ये राखीव वन महसूल क्षेत्र व इतर क्षेत्राचा समावेश ७३.६९ वर्ग किमी क्षेत्र काटेपुर्णा अभयारण्य म्हणून घोषीत केले.


प्रादेशिक वन विभागाकडून, शास्त्रोक्त वन्यजीव व्यवस्थापनासाठी हे अभयारण्य नविनच निर्मित अकोला वन्यजीव विभागाकडे १९९६ मध्ये विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला यांचेकडे हस्तांतरीत करण्यात आले, कोटेपुर्णा अभयारण्याचे व्यवस्थापन विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला यांचेकडून व नियंत्रण मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचेकडे आहे.

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात ( KatePurna Wildlife Sanctuary ) एक वनवर्तुळ असून पाच नियतक्षेत्रे आहेत. अभयारण्यात, अकोला शहरास पाणीपुरवठा करणारा काटेपुर्णा नदीवरील जलाशय आहे. वनक्षेत्र साग वृक्षाचे प्राबल्य असलेले पानगळीचे बने आहे. अभयारण्य आकाराने लहान व चहुबाजूंनी माववस्तीने वेढलेले असले तरी अभयारण्यात बिबट, तरस, कोल्हा हे मांसभक्षी व नियगाय, चितळ, भेकर, काळविट असे प्रमुख वन्यप्राणी आढळतात. यांचे संरक्षणाची तसेच त्यांचे अधिवासाचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धनाची जबाबदारी अभयारण्य प्रशासनावर आहे. अभयारण्याचे व्यवस्थापनासाठी सन २०१३- १४ ते २०२२-२३ या कालावधीसाठी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून तो मंजूर झालेला आहे. अभयारण्यातील व अभयारण्याचे सिमेवरील राहणाऱ्या लोकांचे सक्रीय सहकार्य प्राप्त करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जीनवन योजना राबविणे वनपर्यटनाचे विकासात्मक ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करून देणे. वन्यप्राण्यांचे पिण्याचे पाण्यासाठी व अधिवास संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर जल व मृदसंधारणाची कामे व अधिवास संवर्धनाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. काटेपुर्णा अभयारण्याच्या सभोवतालच्या सर्व गावांच्या विकासासाठी खालीलप्रमाणे महत्वाची कामे राबविण्यात आली आहेत. 

१. पर्यटकांना खाजगी वाहनातून जंगल सफारीसाठी रस्ते दुरूस्त करण्यात आले आहेत. त्यासाठी वाहन शुल्क आकारण्यात आले आहेत. त्यामुळे अकोला वासीयांना  पर्यटनाची मोठी पर्वणी लाभलेली आहे.

२. पर्यटकांना निसर्ग पाऊल वाटेवर भ्रमंतीचा आनंद लुटण्यासाठी वाघा येथे धरण परिसरात २.७ किमी ची निसर्ग पाऊल वाट निर्माण करण्यात आलेली आहे. व त्यावर विविध जंगलाची माहिती दर्शविणारे सुंदर उद्बोधक माहिती फलक लावण्यात आले आहेत.

३. पर्यटकांना राहण्यासाठी ३ सुट तयार करण्यात आले असून २४ तास लाईटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

४. वाघा येथे निसर्गप्रेमी व पक्षी प्रेमी विविध निसर्गाशी संबंधीत खेळ व प्रश्नमंजुषा या सारखे कार्यक्रम राबविण्यात येतात. 

५. विविध सेल्फी पॉईट वाघा परिसरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जलाशयाच्या परिसरात सुर्योदय व सूर्यास्त पाहण्याची संधीही पर्यटकांना लाभली आहे.

६. निसर्ग प्रेमींना अधिक माहिती देण्यासाठी गावातील १० युवकांना गाईड प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

७. येणाऱ्या काळात बोटींग व सायकलींगचा आनंद घेता येणार आहे.



८. दर पौर्णिमेला अभयारण्यातील मचानावर बसुन वन्यजीवाच्या अधिवासाचा आनंद लुटण्यासाठी मचाण पर्यटनही सुरू करण्यात आले आहेत.

९. या तिन दशकपुर्तीच्या प्रसंगी काटेपुर्णा अभयारण्यातील वनकर्मचाऱ्यांनी जवळच्या गावामध्ये जनजागृती रॅली काढण्याचे ठरविलेले आहे. अकोलेकरांना पाणी देणार हे जंगल अकोला जिल्ह्याचा अभिमान आहे. त्यामुळे अकोलेकरांनी काटेपुर्णा अभयारण्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हीच अपेक्षा जनसामान्याकडून करण्यात येत आहे.

या लेखात, आम्ही आपणाला काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य  KatePurna Wildlife Sanctuary याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा

Post a Comment

0 Comments