ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे खामगांव व बुलडाणा या शहरांपासून जवळ व या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यालगत, अजिंडा पर्वतरांगेतील वन्यजीवांचा सुरक्षीत व समृध्द अधिकवास आहे. महाराष्ट्र शासनाने सन १९९७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २०३.५६ वर्ग किमी राखीव वनक्षेत्रासाठी ज्ञानगंगा घोषीत केले. दिनांक १३/१/१९९८ रोजी शास्त्रशुद्ध व्यवस्थापनासाठी अकोला वन्यजीव विभागाने या अभयारण्याचे अधिग्रहण केले. सध्या ज्ञानगंगा अभयारण्याचे व्यवस्थापन अकोला वन्यजीव विभागाकडे व नियंत्रण मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचेकडे आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात दोन वनपरीक्षेत्रे असून त्यांत सात वनवर्तूळ व २१ नियतक्षेत्रे आहेत. अभयारण्याचे सिमेलगत उत्तरेस पलढग व दक्षिणेस माटरगांव हे जलाशय आहेत. अभयारण्य क्षेत्र साग वृक्षाचे प्राबल्य असलेले पानगळीचे वन आहे. अभयारण्यातून खामगांव - बुलडाणा हा राज्य मार्ग जातो व अभयारण्य चहूबाजूंनी मानव वस्तीने वेढलेले आहे. तरी वन्यजीवांनी समृद्ध आहे. अभयारण्यात बिबट, तरस, रानकुत्रा, रानमांजर अस्वल या मांसभक्षी, सर्वभक्षी वन्यप्राण्यांसोबतच निलगाय, भेकर हे तृणभक्षी व इतर सरपटणारे प्राणी हे आहेत. यांचे संरक्षणाची व त्यांचे अधिवासाचे सवंर्धनाची जबाबदारी अभयारण्य प्रशासनावर आहे.
अभयारण्याचे व्यवस्थापनेसाठी सन २०१५-१६ ते २०२४- २५ या कालावधीसाठी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून तो मंजूर झालेला आहे. आराखड्यात वन्यजीवांचे अधिवास संवर्धनासाठी करावयाची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यांत ग्रामपरिसर विकास योजनेअंतर्गत, ग्रामिणांचा विकास व वन्यजीव संरक्षण, संवर्धननत त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करणे, वन्यप्राण्यांचे पिण्याचे पाणी व खाद्यासाठी जल व मृद संधारणाची कामे तसेच कुरणविकास इत्यादी कामे मोठ्या प्रमाणावर घेणे, वनपर्यटनातून ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करून देणे, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना प्रस्तावित आहेत.
मा. मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार खुप बदल अभयारण्यात सन २०१७ मध्ये झाले आहेत. त्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. वनसंरक्षणासाठी रस्ते दुरूस्ती सुमारे १०० किमी करण्यात आली त्यामुळे अभयारण्यातील प्रत्येक भागात जाणे सोपे झाले. जंगलात ठिकठिकाणी बॅरिअर्स बसविण्यात आले त्यामुळे अवैध वाहतूक थांबविणे शक्य झाले. यामुळे वन, वन्यजीव संरक्षणात विलक्षण बदल झाला व मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक, अवैध चराई थांबल्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात जैवविविधता वाढली आहे. आता ज्ञानगंगा अभयारण्यात जैवविविधतेने समृध्द झालेले अभयारण्य म्हणता येईल.
भविष्यात या अभयारण्यात विविध योजना राबविण्यात येणार आहेत.
१. पर्यटकांना खाजगी वाहनातून जंगल सफारीसाठी रस्ते दुरूस्त करण्यात आले आहेत. त्यासाठी वाहन शुल्क आकारण्यात आले आहेत. त्यामुळे बुलडाणा वासीयांना पर्यटनाची मोठी पर्वणी लाभलेली आहे.
२. बोथा येथे निसर्ग परिचय केंद्र दुरूस्ती, नक्षत्रवन दुरूस्ती, पर्यटकांची पाणी व्यवस्था, पर्यटकांची राहण्याची व्यवस्था, इत्यादी विविध सुविधा पर्यटकांची करण्यात येणार आहे.
३. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अंतर्गत एकुण १२ गावे निवडण्यात आले असुन सुमारे २२ लक्ष रूपये शासनाने त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी जंगलावरील ताण कमी करण्यासाठी दिले आहे. त्याचा निश्चितच उपयोग वनसंरक्षण व संबंधितांना होणार आहे. ४. दर पौर्णिमेला अभयारण्यात मचाणवर वन्यजीव अधिवासाचा आनंद वन्यजीव प्रेमींना मिळणार आहे. त्यासाठी मचाण पर्यटन सुरू करण्यात येणार आहे.
५. विविध उद्बोधक फलक अभयारण्यात व नक्षत्रवनात लावण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या ज्ञानात भर पडणार आहे व त्यातून निसर्गाशी मानवाची जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
For online safari booking & accomodation visite The website :


0 Comments