बेहडा वनस्पती विषयी माहिती ( Behda plant information in marathi )
मराठी नाव: बेहडा , वेहळा, हेळा
शास्त्रीय नाव: Terminalia bellirica
इंग्रजी नाव : bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan
वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे सांगणारी आपली संस्कृती आहे. औषधी गुणांनी परिपूर्ण असणारे अनेक वृक्ष आहेत. बेहडा या वृक्षाचा समावेश ही यामध्ये होतो. वनिकरणासाठी रस्त्याच्या कडेला सावलीसाठी उपयोग असणारा आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असलेला बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे.
तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्रवनांत बेहडा आढळतो. कोकणात त्याला भेडा किंवा हेला असेही म्हणतात.बहेडा , बहुवीर्य, भूतवास, कर्षफल, बेहडा , बिभीतक , कलिद्रुम , वेहळा, हेळा अशी अनेक नावे आहेत.
![]() |
| बेहडा फळ |
हा एक आकर्षक वृक्ष आहे. बेहडा वृक्ष २०–३० मी. उंच वाढतो. साल राखाडी रंगाची असून त्यावर अनेक लहानलहान उभ्या भेगा असतात. कोवळी पालवी लालसर रंगाची असते. पाने साधी, एकाआड एक व गुळगुळीत असून ती फांद्यांच्या टोकाला एकत्रितपणे वाढलेली असतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाने गळून पडतात आणि त्यानंतर बेहडा फुलायला लागतो. फुले अगदी लहान व पिवळट असून त्यांना एक प्रकारचा उग्र वास असतो. बेहडा वृक्ष त्याच्या फळांसाठी प्रसिद्ध असून फळे उन्हाळ्यात लागतात. फळे (म्हणजे बेहडे) आठळीयुक्त, २-३ सेंमी. व्यासाची, लंबगोल आणि तपकिरी असतात. प्रत्येक फळात एकच बी असते. ही फळे पक्षी, खारी, माकडे आणि शेळ्यामेंढ्या तसेच हरिणे खातात. ञिफळा चुर्ण मधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे बेहडा होय.
यांचे लाकूड हलक्या प्रतीच्या घरबांधणीसाठी, फळ्या बनविण्यासाठी आणि बैलगाड्या व होड्या करण्यासाठी तसेच कागदाचा लगदा, कोळसा व जळाऊ लाकूड तयार करण्यासाठी वापरले जाते. प्लायवुड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड उत्तम समजले जाते. फळांमध्ये १७% टॅनीन असते. त्याचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, तसेच कापड उद्योगात केला जातो.
अनेकविध आजारात उपचारासाठी बेहडा वापरला जातो. जेवणानंतर पाच ग्रॅम चूर्ण कोमट पाण्यात घेतले तर पचनशक्ती वाढते.खोबरेल तेल, तिळ तेल पन्नास पन्नास ग्रॅम व पन्नास ग्रॅम बेहड्याच्या फळांचे चुर्ण घालून तेल उकळवा. गाळून भरून ठेवा रोज रात्री लावले तर एक केसही गळणार नाही. बेहड्याचा फळांचा लेप उगाळून रांजणवाडी वर बाहेरून लावा रांजणवाडी जाईल. बेहड्याचा फळांचा लेप शितपित्तावर लावा अंगावरील गांध चट्टे जातील तोंडातून खूप लाळ गळत असेल तर बेहडा चुर्ण दोन ग्रॅम दोनदा मधात चाटवतात.हर्निया च्या गाठीवर बेहड्याचा लेप लावावा. सारखी खाज खरूज येतेय तर बेहड्याच तेल लावावे.
डोळ्याची दृष्टी सतत कमी होत असेलतर बेहडा चूर्ण दोन ग्रॅम बाळंतशेपा दोन ग्रॅम व खडीसाखर दोन ग्रॅम रोज दोनवेळा खावे.बेहड्याच्या फळांचे तेल पिंपल्स, मुरुम, तारुण्यपिटीका,पिंपल्स वर लावल्यास वात, पित्त कफाचे न जाणारे पिंपल्स ही जातात. नपुसकपणा दूर करण्यासाठी बेड्याची साल विड्याच्या पानात दोन बदाम व एक गोडंबी सोबत खायला देतात. घसा बसलेला असेल तर भेडाच्या चूर्ण पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात . जनावरांच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी पण त्याचा वापर केला जातो. बेहडा रक्तातील दोष दूर करतो तसेच पोटातील कृमी नाशक आहे. टीबी क्षय रोगात तो लाभदायक आहे.
![]() |
| बेहडा फळ |
बेहड्याचा ५० ग्रॅम काढा सकाळी घेतल्यास ताप उतरतो. बेहडा व जवस यांचा काढा रोज सकाळी दुपारी संध्याकाळी पन्नास एम एल घेतल्या पित्त शांत होते, कफ, सर्दी, खोकला, ताप कमी होतो.बेहडा चुर्ण पाच ग्रॅम, अश्वगंधा चूर्ण पाचग्रॅम एकत्रित उकळून नियमितपणे घेतल्यास ह्रदयविकारात आराम मिळतो, बीपी नॉर्मल होते.बेहड्याची साल तोंडात धरा कफ खोकला कमी होतो. लहान मुलांना पोटसाफ होत नसेल तर फळ उगाळून अर्धा ते पाव चमच तो रस दोन चमचे दूधात देणे. बेहड्याचा सालीचे चुर्ण दोन ते पाच ग्रॅम लवंग चुर्ण दोन लवंगांचे एकत्रित करून मधात चाटवा कसलेही जुलाब बंद होतील.
![]() |
| बेहडा झाडाची पाने |
बेहड्याचा फळाचे चुर्ण दोन चमचे भांडभर पाण्यात भीजवून सकाळी ते लावा केस गळणं काही दिवसात बंद होतं केस काळेच राहतात अथवा पांढरे काळे व्हायला लागून गळतीची समस्या बंद होते तीन महीन्यात पुर्ण फरक दिसतो.लावल्यानंतर चार तासाने धुवायचे. बेहड्याची साल ४० ग्रॅम, नवसागर दोन, एक ग्रॅम सोन गेरु च मिश्रण करुन ते रोज दोन ग्रॅम चुर्ण मधात रोज सकाळी संध्याकाळी घ्या. दमा, अस्थमा दुर होतो, पंपाची गरज बंद होते. बेहडा वातदोष दूर करतो, पित्त दोष दूर करतो, कफ दोष दूर करतो.शरीरातील कुठल्याही प्रकारची जळजळ असेलतर दोन तीन चमचे चुर्ण पाण्यात घालून प्या दोन वेळा, त्वचेची आग होत असल्यास लेप देणे जळजळ थांबते. अपचन दुर करुन आमाशय स्ट्रॉंग बनवतो भूक वाढवतो. मुळव्याधीत अत्यंत गुणकारी आहे. घशाचे विकार, आवाजाच्या त्रासात ही लाभदायक. दमा, अस्थमा, श्वसनासंबधीत आजारात गुणकारी. रोज तीनचार ग्रॅम मधात घेतल्यास मुत्रमार्गातील जळजळ इनफेक्शन कमी होते. बेहड्याच्या ताज्या फळांचा मुरंबा कुठल्याही प्रकारचा खोकला दूर करतो. बेहड्याची चारपाच पाने व साखर व थोडी साल ताजी पाण्यात उकळून प्यावे कफ मोकळा होतो बेटका पडणे बंद होते.



0 Comments