MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अॅन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून लोकसेवकाविरुध्द लाचेच्या सापळा प्रकरणात तक्रारदाराकडून घेण्यात आलेल्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक. 26.03.2008.

 अॅन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून लोकसेवकाविरुध्द लाचेच्या सापळा प्रकरणात तक्रारदाराकडून घेण्यात आलेल्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याबाबत....


महाराष्ट्र शासन 

गृह विभाग

शासन निर्णय: असीबी ०५०४/सीआर-१५१/पोल-२.

 मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २६ मार्च, २००८


वाचा:- शासन निर्णय असीबी ०६८६/सीआर-१८९/पोल-२, दिनांक २६ नोव्हेंबर, १९८६


प्रस्तावना :- 

अॅन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत लोकसेवकाविरुध्द आयोजित करण्यात येत असलेल्या लाचेच्या सापळा प्रकरणात लाचेची रक्कम तक्रारदारांकडून घेण्यात येते. सदर रक्कम न्यायालयाच्या न्यायनिर्णयापर्यंत मुद्देमाल म्हणून न्यायालयात दिर्घकाळ जमा असते. तक्रारदारांकडून यशस्वी लाच प्रकरणात घेण्यात आलेल्या रकमा अॅन्टी करप्शन ब्युरोकडून संदर्भाधीन शासन निर्णयामधील तरतूदी नुसार निधीच्या उपलब्धतेनुसार सहा महिन्यांच्या कालावधीनंतर परत करण्यात येत आहेत. राज्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण राहण्यासाठी अधिकाधिक तक्रारदार तक्रार करण्यास पुढे येण्यासाठी तक्रारदारांकडून घेण्यात आलेली लाचेची रक्कम परत करण्याचा सहा महिन्यांचा कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय

 वर प्रस्तावनेत नमुद केल्यानुसार शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे:-

(i) तक्रारदाराकडून घेण्यात आलेली लाचेची रक्कम तक्रारदारास अनुदान उपलब्धतेच्या अटीच्या अधिनिस्त लाचेच्या सापळयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीतनंतर लगेच परत करावी.

(ii) न्यायालयाकडून वितरित केली जाणारी लाचेची रक्कम स्वीकारण्यास, जमा करण्यास व तिचे समायोजन करण्याचा शासनाचा अधिकार असेल अशा आशयाचे शासन निर्णय: असीबी ०६८६/सीआर १८९/पोल-२, दिनांक २६ नोव्हेंबर, १९८६ मधील परिच्छेद २ (i) मध्ये नमूद केल्याप्रमाणे परिशिष्ट 'ए'नमुन्यात करारपत्र व परिशिष्ट 'बी 'नमुन्यात प्राधिकारपत्र तक्रारदाराने सादर करावे

(iii) लाचेच्या सापळा प्रकरणी न्यायालयात जमा करण्यात आलेली रक्कम व तक्रारदारास परत करण्यात आलेली रक्कम याबाबतचा ताळमेळ घेण्यासाठी स्वतंत्र नोंदवही महासंचालक, अॅन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात ठेवण्यात यावी..

२. महासंचालक, अॅन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तक्रारदारांकडून घेण्यात आलेली लाचेची सापळा रक्कम निधीच्या उपलब्धतेनुसार तक्रारदारांना विहित कालावधीत परत करण्यासंदर्भात प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. तक्रारदारांना सापळा प्रकरणातील लाचेची रक्कम परत करण्यासंदर्भात होणारा खर्च " मागणी क्र. बी-१. २०५५ पोलीस, .(००) (०३) लाचलुचपत विरोधी केंद्र, (१३) कार्यालयीन खर्च" या लेखाशिर्षाखाली उपलब्ध असणा-या तरतूदीमधून भागविण्यात यावा व या संदर्भात प्राप्त होणा-या रकमा " ००५५ पोलीस, १०३ (०१) फी, दंड व जप्तीच्या रकमा, (०१)(०१) संकीर्ण (००५५ ००८ ४) " या लेखाशिर्षाखाली जमा करण्यात याव्यात.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने अनौपचारिक संदर्भ क्र. ११६/०८/व्यय-७, दिनांक ११मार्च, २००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक २००८०३२६१११८२७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ज. महाजन)

सह सचिव, गृह विभाग,

 महाराष्ट्र शासन

Post a Comment

0 Comments