अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी.. (वनहक्कांची मान्यता) अधिनियम-२००६ च्या अंमलबजावणी संदर्भात स्पष्टीकरणात्मक सूचना..
महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक क्रमांक: एस-१०/२००७/१२५७/प्र.क्र.३०९ /फ-३० दिनांक :- २३/१०/२००८
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
परिपत्रक
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ च्या अंमलबजावणी संदर्भात पुढीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना प्रसारीत करण्यात येत आहेत. सदर सूचनांनुसार अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात यावी.
अ) नियम 11 खाली वनअधिकार समितीकडे प्राप्त होणऱ्या अर्जावर नियम 12 (1) प्रमाणे वन विभागास पूर्वसूचना देवून वनअधिकार समितीने पुढील कार्यवाही करावयाची आहे. अशी तरतूद आहे. सदर नियमात वनविभाग म्हणजे वन विभागातील परिक्षेत्र अधिकारी आणि वनविकास महामंडळाच्या क्षेत्राच्या बाबतीत हद्दीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन विभागाच्या वन्यजीव शाखेच्या ताब्यातील क्षेत्राच्या बाबतीत हद्दीचे वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) असा अर्थ धरण्यात यावा.
ब) नियम 12 (1) मध्ये वनविभागास पूर्वसूचना देणे म्हणजे ज्या दावा अर्जाबाबत • वनअधिकार समिती चौकशी करीत आहे त्या दावा अर्जाची सर्व सहपत्राच्या / पुराव्यांची प्रत संलग्न करुन लेखी स्वरुपात माहिती परं परिच्छेद अ मध्ये नमूद हद्दीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देणे असा अर्थ समजणेत यावा. जेणेकरून प्रत्यक्ष स्थळपाहणी व चौकशीपुर्वी स्थळाची व संबंधित अभिलेखाची आवश्यक ती तपासणी करने संबधित वनक्षेत्रपाल यांना सोयीचे होईल
क) नियम 12 (4) च्या प्रयोजनासाठी हद्दीचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वनसंरक्षक यांना संबंधित प्राधिकारी समजण्यात यावे.
ड) सदर नियम ४ (१) (सी) मध्ये संबंधित अथॉरीटीज म्हणजे परिच्छेद अ मधील नमुद अधिकारी समजण्यात यावेत व ग्रामसभेने जाण्यावर ठराव पारित करण्यापूर्वी वन विभागाची बाजू ऐकून घेण्यास्तव पूर्व सूचना त्यांनाच द्यावी.
इ) ग्रामसभेकडून समितीचे निष्कर्ष बाबत छाननी करुन ग्रामसभेने नियम ४ (१) (सी) खाली ठराव संमत केल्यावर ठरावाची प्रत वर परिच्छेद-अ मध्ये नमुद संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व नियम १२ (१) खाली झालेल्या स्थळपाहणी व चौकशीच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याकडे ग्रामसभेने पाठवावी..
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.
(राजेंद्र मंगरूळकर)
सह सचिव (वने)
महसूल व वन विभाग
0 Comments