MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र वन ( सुधारणा) नियम 2023 ( महाराष्ट्र वन नियमावली 2014 मधील नियम 31 मध्ये सुधारणा)

महाराष्ट्र वन ( सुधारणा) नियम 2023 ( महाराष्ट्र वन नियमावली 2014 मधील नियम 31 मध्ये सुधारणा)



 भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक. टीआरएस-११/२०२१/प्र.क्र.३१५/एफ- ६. भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ४१ व ७६ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र वन नियम, २०१४ यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :-
नियम क्रं १. या नियमांस, महाराष्ट्र वन (सुधारणा) नियम, २०२३, असे म्हणावे.
नियम क्रं २. महाराष्ट्र वन नियम, २०१४ याच्या नियम ३१ मध्ये पोट-नियम (१) मधील, " प्राधिकृत अधिकारी किंवा व्यक्तीद्वारे असा परवाना " या मजकुरानंतर, "किंवा राष्ट्रीय वाहतूक परवाना प्रणालीमार्फत दिलेला ईलेक्ट्रॉनिक परवाना " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.


INDIAN FOREST ACT, 1927.
NOTIFICATION
No. TRS-11/2021/C.R.315/F-6.-In exercise of powers conferred by the section 41 and 76 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), in its application to The State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf, The Government of Maharashtra, hereby make the following rules, further to amend The Maharashtra Forest Rules, 2014, as follows namely:-
1. These rules may be called The Maharashtra Forest (Amendment) Rules, 2023.
2. In Rule 31 of The Maharashtra Forest Rules, 2014, in sub-rule (1), after the words "to issue such pass", the words " or an electronic transit pass issued through National Transit Pass System" shall be inserted

Post a Comment

0 Comments