MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी( वन अधिकाराची मान्यता) अधिनियम 2006 च्या अमंलबजावणी बाबत. शासन परिपत्रक दिनांक 19.11.2009

 आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी( वन अधिकाराची मान्यता) अधिनियम 2006 च्या अमंलबजावणी बाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग, 

शासन परिपत्रक क्रमांक:- एस-१०/२००७/१२५७/प्रक्र.३०९ /फ-३, दिनांक : १९ नोव्हेंबर, २००९.

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.


परिपत्रक

अनुसूचित जमाती व अन्य पांरपरिक जंगलवासी (वन अधिकाराची मान्यता) अधिनियम २००६ मध्ये मान्य केलेल्या वन हक्काच्या क्षेत्राचा जी.पी.एस. GPS द्वारे तयार केलेल्या नकाशासह वनहक्क पत्रक जिल्हास्तरीय समितीकडून जारी झाल्यानंतर सदर जी.पी.एस. द्वारे तयार केलेल्या नकाशांवर अक्षांश-रेखांशचा उल्लेख असला तरी त्या चनक्षेत्राची सिमा सहजपणे स्थानिक लोकांच्या त्याचप्रमाणे संबंधीत वन अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल अशा तन्हेने या क्षेत्राच्या हद्दीवर योग्य आकारमानाचे बुरुज किंवा खुण घालून सिमांकन करावे व सदर क्षेत्र सद्या उपलब्ध असलेले गाव नकाशे किया सर्व्हे ऑफ इंडियाकडून तयार केलेल्या वन टोपोशिट (Forest Toposheets ) अथवा दोन्हीवर बिनचूकपणे दर्शविण्यात यावे जेणेकरून कालांतराने जागेवरील संबंधित वनक्षेत्राची सिमा नाहीशी झाली तरी ती नकाशावरुन सहज पुनर्स्थापित करणे शक्य होईल. वरील प्रमाणे गाव नकाशावर दुरुस्ती / टोपोशिटवर संबंधित क्षेत्र बिनचुक दर्शविण्याचे काम भूमि अभिलेख विभागाकडून करण्यात यावे.


(नितीन काकोडकर )

 सह सचिव (वने)


Post a Comment

0 Comments