लोकसेवकाविरुध्दच्या खटल्यामध्ये
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या
कलम 197 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल
करण्यापूर्वी शासनाची पूर्वमंजुरी घेण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन परिपत्रक क्रमांक इएनक्यू- ११०६ / प्र. क्र. ९९/पोल-२ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक २२ डिसेंबर, २००६.
परिपत्रक
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (सन १९७४ च २) च्या कलम १९७ (१) मधील तरतुदीनुसार, शासनाशिवाय अगर शासनाच्या मंजुरीशिवाय अन्य कोणाहीकडून पदावरून दूर करता न येण्यासारखा असा एखाद्या लोकसेवकावर आपली शासकीय कामे पार पाडताना त्याने अपराध केल्याचे अभिकथन करण्यात आले आहे अशा कोणत्याही अपराधाचा आरोप ठेवण्यात आला असेल तेव्हा, सदर व्यक्ती राज्याच्या कारभारासंबंधात नोकरीला आहे किंवा अधिकधित अपराध कराण्याच्यावेळी त्या नोकरीत होता त्याच्या बाबतीत राज्य शासनाच्या पूर्वमंजुरीखेरीज कोणतेही न्यायालय अशा अपराधाची दखल घेणार नाही त्याचप्रमाणे कलम १९७४ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्या व्यक्तीने कोणत्यारीतीने व कोणत्या अपराधाबदद्ल अशा लोकसेवकावर खटला चालवावयाचा ते निर्धारीत करता येईल.
शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की. काही प्रकरणात वरीलप्रमाणे कलम १९७ (१) अन्वये संरक्षित लोकसेवकाविरुध्द शासनाची पूर्वमंजुरी न घेता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येते. सदर कार्यवाही ही फौजदारी प्रक्रिया संहितेतील उपरोक्त तरतूदीचे उल्लंघन करणारी आहे. परिच्छेद क्र. १ मधील तरतुदी लक्षात घेता, अशा लोकसेवकांविरुध्द त्याच्या कार्यालयीन कामकाजासंबंधात अपराधाचा आरोप ठेवण्यात आला असेल तेंव्हा शासनाच्या पूर्वमंजरीशिवाय या अपराधाची न्यायालय दखल घेणार नसल्याने, तसेच कोणत्या अपराधाबददल लोकसेवकांविरुध्द खटला चालवायचा याचा निर्णय घेण्यास शासन सक्षम असल्याने, अशा प्रकरणांमध्ये, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम, १९७ (१) अन्वये शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक आहे अथवा कसे याबाबतच्या निर्णयासाठी, अशी प्रत्येक प्रकरणे शासनाकडे सादर करणे आवश्यक
वरीलप्रमाणे संरक्षण उपलब्ध आहे अशा लोकसेवकांविरुद्ध दाखल गुन्हयांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७ (१) अन्वये शासनाची मान्यता आवश्यक आहे अथवा कसे याबाबत निर्णयासाठी अशी सर्व प्रकरण शासनाकडे संबंधित प्रशासकिय विभागामार्फत सादर करण्यात यावीत.
3. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक २००६१२२११७४९०८००१ असा आहे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.
(बि. फ. बसावे )
कार्यासन अधिकारी,
गृह विभाग, महाराष्ट्र शासन
.
0 Comments