MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत उत्कृष्ट कामे केलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांना संत तुकाराम ग्राम योजनेच्या निधीतून ग्राम पारितोषिके प्रदान करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 05.08.2019

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत उत्कृष्ट कामे केलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांना संत तुकाराम ग्राम योजनेच्या निधीतून ग्राम पारितोषिके प्रदान करण्याबाबत.


 महाराष्ट्र शासन 
महसूल व वन विभाग, 
 शासन निर्णय क्रमांक एफडीएम-२०१८/प्र.क्र.१०९/फ-२ : मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
 दिनांक : ५ ऑगष्ट, २०१९ 
 वाचा 

१. शासन निर्णय क्रमांक एम. एफ.डी.- २००५/प्र.क्र.३१३/फ-२, दि. २३/११/२००६. 
२. शासन निर्णय महसूल व वन विभाग, एफडीएम २००५/प्र.क्र.३१३/फ-२, दि. १५.०२.२००८.
 ३. शासन निर्णय महसूल व वन विभाग, एफडीएम २००५/प्र.क्र.३१३/फ-२, दि. १५.०५.२००८.
 ४. शासन निर्णय क्रमांक डब्लयूएलपी-०५१५/प्र.क्र.१५५/फ-१, दि. ४/८/२०१५. 
५. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर कार्यालयाचे पत्र क्र. कक्ष- २२ (६)/योजना/ प्र. क्र. ९६ (१७-१८) / ५९/१९-२०. दि. ८.४.२०१९. 

 प्रस्तावना :- 

 राज्यातील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन निर्णय दिनांक २३.११.२००६ अन्वये "संत तुकाराम वनग्राम योजना" ची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेस राज्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने सदर शासन निर्णयामध्ये संदर्भिय शासन निर्णय क्रमांक २ व ३ अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. 
 याच धर्तीवर गावातील "जन-जल-जंगल-जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, गावकऱ्यांची वनांवरील निर्भरता कमी करणे, शेतीला पुरक जोडधंदे निर्मिती करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे, यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणे व अशा तऱ्हेने गावकऱ्यांच्या सहभागातून वन वन्यजीवांचे संरक्षण व व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे. म्हणून वन व वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाकरिता संरक्षित क्षेत्रालगतच्या गावात परिस्थितीकीय विकास कार्यक्रमाद्वारे गावांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत सर्वकष विचार करुन शासन निर्णय दि.०४.०८.२०१५ अन्वये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येत आहे.
 वनांचे संरक्षण व गावांचा विकासासाठी उत्कृष्ट काम केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना जिल्हा व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन पारीतोषिक संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत देण्याची तरतूद अस्तित्वात आहे. त्याच प्रमाणे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम परिस्थितीकीय समितींना प्रादेशिक व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन पारीतोषिके देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने संत तुकाराम वनग्राम योजना दि.२३.११.२००६ च्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

शासन निर्णय खालील प्रमाणे

 


या लेखात, आम्ही आपणाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत उत्कृष्ट कामे केलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांना संत तुकाराम ग्राम योजनेच्या निधीतून ग्राम पारितोषिके प्रदान करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 05.08.2019 याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा

Post a Comment

0 Comments