MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

World Ozone Day : जागतिक ओझोन दिवस


World Ozone Day : जागतिक ओझोन दिवस


सजीव प्राण्यांना आज जिवंत राहण्यासाठी आँक्सिजनची गरज असते. पण आँक्सिजनपेक्षा देखील अशी एक गोष्ट आहे जी सर्वासाठी खुप महत्वाची आहे. ती म्हणजे ओझोन वायु म्हणुन आपण पृथ्वीवरील सर्व लोक ओझोन वायुचे रक्षण करण्यासाठी तसेच त्याविषयी जनजागृती करण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिवस देखील साजरा करत असतो.  आपल्याला पर्यावरण विभागाकडुन ओझोन वायुचे महत्व पटवुन दिले जाते. आणि ओझोन वायुच्या संरक्षणासाठी प्रेरित केले जाते.

केला. त्यानिमित्ताने 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.



ओझोन वायुचे महत्व -

ओझोन हा एक नैसर्गिक पदधतीने निर्माण होत असलेला प्राणवायु आहे. जो पृथ्वीपासुन चाळीस किलोमीटर अंतरावर असतो.आणि हा प्राणवायु सुर्यापासुन निर्माण होत असलेल्या सुर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यापासुन रोखत असतो. त्याचसोबत सुर्यापासुन निर्माण होत असलेल्या सुर्यकिरणांना ओझोन वायु एकमेकांपासुन वेगळे करत असतो .ज्यामुळे त्यांचा प्रभाव देखील कमी कमी होत जातो.ज्यामुळे पृथ्वीवरील सजीवांना कोणतीही हानी पोहचत नसते.म्हणजेच पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करण्याचे काम ओझोन वायु करत असतो.

पृथ्वीवरील ओझोन वायु कमी होण्याचे परिणाम : आज आपण पाहावयास गेले तर ज्या ओझोन वायुच्या संरक्षण कवचामुळे सर्व सजीव सृष्टी संरक्षितपणे जीवन जगत आहे.आज तोच ओझोन वायु हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. ह्याचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत :

1) जागतिक तापमानवाढ होणे : - 

पृथ्वीवर येत असलेल्या सुर्याच्या किरणांना ओझोन वायु शोषुन घेण्याचे कार्य करतो.पण पृथ्वीवरील ओझोन वायुच्या प्रमाण कमी झाल्यामुळे सुर्यापासुन निर्माण होत असलेली अतिनील सुक्ष्म किरणे ही जमिनीवर पडतात ज्यामुळे जमिनीला छिद्रे देखील पडतात.ज्यामुळे पृथ्वीच्या खालील तप्त भाग हा वर येत असतो.मग पृथ्वीवरील सर्व तापमान हे अवाजवी वाढत असते.ज्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीला भोगावा लागतो.

2) अवेळी पुर वादळ येणे : -

 पृथ्वीवरील ओझोन वायु कमी होत गेल्यामुळे सुर्याची अतिनील सुक्ष्म किरणे जमिनीवर पडतात ज्याचे परिणाम स्वरुप पृथ्वीवरील तापमानात वाढ होते.ज्यामुळे अकाल पाऊस पडणे,भुकंप येणे,वादळ येणे,नदीला पुर येणे असे प्रकार घडतात.

3) सजीव प्राण्यांची जीवहानी : -

 सुर्यापासुन जी अतिनील सुक्ष्म किरणे जमीनीवर पडत असतात ती किरणे जर सजीव प्राण्यांवर म्हणजेच कोणत्याही व्यक्तीवर पडली तर त्याला कर्करोग देखील होऊ शकतो.ही किरणे एखाद्या व्यक्तीच्या डोळयांवर पडली तर त्याला मोतीबिंदुचा आजार देखील होण्याची दाट शक्यता असते.एवढेच नाहीतर ही किरणे जर प्राण्यांवर तसेच पिकांवर पडली तर पिकांची रोगराईमुळे नासाडी होते त्यांच्या वाढीमध्ये खुंट निर्माण होत असते.त्यांची हवी तेवढी चांगल्या पदधतीने वाढ होत नसते.अनेक प्राणी रोगराईमुळे मृत्यृमुखी पडतात.

सर्व मानव जातीच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी ओझोन वायुचे वातावरणात असणे फार गरजेचे आहे.पण काही रासायनिक वायुंमुळे आणि त्यांच्या आपल्या दैनंदिन जीवणात केलेल्या रोजच्या वापरामुळे ओझोन वायुचे प्रमाण कुठेतरी कमी होत चालले आहे.म्हणुन ह्यासाठी आपण काहीतरी ठोस उपाययोजना करणे देखील अत्यंत गरजेचे आहे.

वातानुकुलित यंत्रे तसेच शीतकपाटामध्ये हवा थंड करण्यासाठी जे क्लोरोप्लोरोकार्बन तसेच कार्बन टेटाँक्साईड वायु वापरले जात असतात.हे वायु हवेमध्ये जेव्हा मिसळत असतात तेव्हा हे ओझोन थराला नष्ट करण्याचे काम करत असतात.म्हणुन घरगुती वापरात क्लोरोप्लोरा कार्बन तसेच कार्बन टेटाँक्साईडचा वापर करणे टाळावे.

Post a Comment

0 Comments