MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

प्रश्न उत्तर

   प्रश्न क्रं 1 : 'गुंटूर साखळी' कशाला म्हणतात?

      उत्तर: ब्रिटिशांनी भारतात जमिनीचे मोजमाप साखळी पद्धतीने केले. यामध्ये त्यांनी जमिनीचे क्षेत्र एकर गुंठ्यात काढले. या भूमापनासाठी गुंटूर नामक अधिकार्‍याने ३३ फूट लांबीच्‍या साखळीचा उपयोग केला होता. गुंटूर या अधिकार्‍याच्‍या नावावरून या साखळीला 'गुंटूर चेन' असे नाव पडले. गुंठा हा शब्द याच गुंटूर या अधिकार्‍याच्‍या नावावरून रूढ झाला असे म्‍हणतात. ही चेन (साखळी) ३३ फूट लांबीची असूनती १६ भागांत विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हटले जात होते. एक साखळी लांब आणि एक साखळी रुंद अशा ४० गुंठ्यांचा एक एकर असे प्रमाण ठरवण्यात आले. लांबी व रुंदी साठी जेव्‍हा आणे पै चा उपयोग केला जातो तेव्‍हा सोळा आणे म्हणजे तेहतीस (३३) फुट व एक आणा म्हणजे १६/३३.
लांबी व रुंदी साठी जेव्‍हा आणे पै चा उपयोग केला जातो तेव्‍हा:
· १६ आणे म्हणजे ३३ फुट
· एक आणा म्हणजे (१३/३३)
· ....... ही खुण नकाशावर पायवाट दर्शविते.
· ========== ही ही खुण नकाशावर गाडी वाट दर्शविते.
· ------  तुटक तुटक रेषा ही खुण नकाशावर वहिवाटीची हद्द दर्शविते.
· ________सरळ रेषा ही खुण नकाशावर अभिलेखानुसार असणारी हद्द दर्शविते.
· कायम हद्दीच्या खुणा ‘क्र’ या संकेतांकाने काळ्या शाईने दर्शविल्‍या जातात.
· नवीन हद्दीच्या खुणा ‘ग्र’ या संकेतांकाने तांबड्या शाईने दर्शविल्‍या जातात.
· एक आणा .......... या खुणेने दर्शविला जातो.
· दोन आणे  _._._. या खुणेने दर्शविले जातात.

Post a Comment

0 Comments