MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अवर्गीकृत वन Unclassed forest मध्ये वन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया

mahaforest logo

अवर्गीकृत वन Unclassed forest मध्ये वन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया

 मित्रांनो आज आपण  अवर्गीकृत वन ( unclassed Forest) या विषयी माहिती पाहणार आहोत. मुळात वन विभागाकडे राखीव वन ( reserve forest) , संरक्षित वन ( protected forest) , खाजगी संपादीत वन ( final acquired forest),  अवर्गीकृत वन ( unclassed Forest) या प्रकारच्या वनाचा समावेश असतो, यापैकी राखीव वन ( reserve forest) , संरक्षित वन ( protected forest) , खाजगी संपादीत वन ( final acquired forest), यामध्ये वन गुन्हा घडला तर आपण भारतीय वन अधिनियम 1927 अंर्तगत गुन्हा नोंद करून कारवाई करतो. जर अवर्गीकृत वनामध्ये (unclassed Forest) वन गुन्हा घडला तर भारतीय वन अधिनियम  1927 अन्वये कोणत्या कलमानुसार प्रथम गुन्हा रीपोर्ट नोंदवावा असा प्रश्न समोर येतो.  अवर्गीकृत वन नावाप्रमाणेच कोणताही वर्ग नसलेले वन आहे. अवर्गीकृत वनाच्या संरक्षणासाठी कोणताही स्वतंत्र वेगळा कायदा नाही व तशी तरतूद पण नाही. तसेच अवर्गीकृत वन हे राखीव वन म्हणून घोषीत करण्याची प्रक्रिया खुप वेळ घालवणारी आहे. येथे प्रश्न पडतो जर अशा वनाच्या संरक्षणासाठी वेगळा कायदा नसेल तर मग या वनात गुन्हा घडला तर काय करायचे? सदर गुन्हा कोणत्या कायद्या अंर्तगत नोंदवायचा? अवर्गीकृत वनात वन गुन्हा घडला तर आपणास दोन प्रकारे कारवाई करता येईल ते खालीलप्रमाणे...

1) भारतीय वन अधिनियम 1927 कलम 69 हे पाहीले तर शासकीय जमिनीवरील वन उत्पादन हे शासकीय मालकीची आहेत. सदर वन उत्पादने शासनाची समजली जातात. तसेच वन उत्पादनाची मालकी जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती शासनाच्या मालकीची समजली जातात. अवर्गीकृत वन हे शासनाच्या मालकीचे असल्याने त्यावरील वन उत्पादने शासनाच्या मालकीची आहेत . म्हणून अवर्गीकृत वनातील वन गुन्ह्यासाठी आपणास भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 69 चा वापर करता येऊ शकतो. 

 भारतीय वन अधिनियम 1927 कलम 77 नुसार उक्त अधिनियमातील कलमान्वये केलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून 1 महीना कारावास कींवा 500/- दंड अशी तरतूद आहे. या कलमानुसार आपणास अवर्गीकृत वनातील वन गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे हे आपले म्हणून सक्षमपणे न्यायालयात मांडावे लागेल. सदर अवर्गीकृत वनासाठी स्वतंत्र कायदा नसल्याने आपणास भारतीय वन अधिनियम 1927 कलम 69 व 77 याचा उपयोग करून प्रथम गुन्हा रीपोर्ट नोंदवून कारवाई करावी लागेल.

2) तसेच आपण वनसर्वधन अधिनियम 1980 नुसार पण वन गुन्हा नोंद करता येऊ शकतो

3) अशा अवर्गीकृत वनात वन गुन्हा घडला तर आपणास पोलीसात देखील खबर देऊन FIR नोंद करता येईल. 

     एकंदर अशा वनांच्या संरक्षणासाठी वन कायदा तसेच पोलीस विभाग यांचा उपयोग करणे आवश्यक आहे.

.....धन्यवाद.......

Post a Comment

0 Comments