MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

सिंधुदुर्ग जिल्हयातील वनेत्तर क्षेत्रामधील वृक्षतोड परवानगीबाबत मार्गदर्शक सुचना... शासन निर्णय 27.07.2016

 सिंधुदुर्ग जिल्हयातील वनेत्तर क्षेत्रामधील वृक्षतोड परवानगी बाबत मार्गदर्शक सुचना... शासन निर्णय 27.07.2016


राष्ट्रीय हरित न्यायधिकरण (पश्चिम झोन), पुणे यांचेकडे दाखल अर्ज क्र.११/२०१५ मध्ये मा. हरित न्यायाधिकरण, पुणे दिनांक ८.१.२०१६ च्या आदेशानुसार महसूल व वन विभागास सिंधुदूर्ग जिल्हयासाठी यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने संदर्भ क्र. १ अन्वये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी मार्गदर्शक सूचनांचे प्रारुप शासनास मान्यतेस सादर केले. सदर मार्गदर्शक सूचनांच्या जारी करण्याचे शासनाचे विचाराधीन होते. त्यानुषंगाने सिंधुदूर्ग जिल्हयात वनेत्तर क्षेत्रावर होणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत.

सिंधुदूर्ग जिल्हयातील वनेत्तर क्षेत्रातील वृक्षतोड परवानगीबाबत मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहे :-

१. काही विशिष्ठ प्रजातीच्या वृक्षांना त्याचे संरक्षण सुनिश्चित व्हावे, व मातीची धुप कमी होईल यासाठी विधी मंडळाने महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ पारीत केलेले आहे. २. तनतंर शासनाद्वारे जारी दिनांक ५.८.१९८९ चे अधिसुचनानुसार महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत

(विनियमन) अधिनियम १९६४ ची अमंलबजावणी वनविभागाद्वारे करण्यात येत आहे. ३. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ चे कलम २ (ग) मधील दिलेल्या वृक्ष

अधिकारी या पदाकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांना नामनिर्देशित केलेले आहे. ४

. सदर कायद्याच्या कलम ३ (१) ची तरतूद खालीलप्रमाणे आहे :-

कोणतीही रुढी परिपाठ किंवा त्या-त्या वेळी अमंलात असलेला कोणताही कायदा अथवा कोणत्याही न्यायालयाची हुकुमनाचा किंवा आदेश असला तरी किंवा कोणत्याही सलेखात एतद्विरुध्द काहीही अंतर्भुत असले तरी राज्य शासनाने रीतसर अधिकार दिलेल्या (वृक्ष अधिका-याच्या) लेखी पूर्व परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःच्या मालकीच्या किंवा इतर कोणत्याही जमिनीतील कोणतेही झाड तोडणार नाही किंवा असे तोडावयास लावणार नाही. चे कलम ३ (१)-क अन्वये कोणताही

५. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम-१९६४ व्यक्तीची एखादे झाड तोडण्याची इच्छा असेल तर ती त्या संबधात परवानगी मिळण्यासाठी पोट कलम (१) अन्वये संबंधीत वृक्ष अधिकारी यांचेकडे अर्ज करील. अर्जदाराने वृक्ष अधिकारी यांना अर्ज करावयाचा नमुना व इतर माहिती वनविभागाचे संकेतस्थळ mahaforest.nic.in वर सविस्तर दिला असुन ऑनलाईन अर्ज करण्याची सोयदेखील करण्यात आली आहे.
६. सदर अर्ज जर संकेतस्थळावर नोंदविण्यात आले असेल तर उक्त सहपत्राची मुळ प्रत संबंधीत वृक्ष अधिकारी यांचे कार्यालयात तपासणी करण्यास देणे आवश्यक आहे. वरील दस्तावेजा व्यतिरिक्त कोणताही इतर दस्तावेज वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांनी स्पष्ट कारण नमुद केल्याशिवाय (ती दस्तावेज नसल्यास तसा परवानगी देण्याची कार्यवाही न्यायपुर्ण होणार नाही) मागता येणार नाही.

७. कास्तकाराकरीता स्वतःच्या शेतावरील अनुसुचित वृक्षामधील झाडे तोडण्याकरीता अर्ज लेखी स्वरुपात व संकेतस्थळावर सेवा वैकल्पिक स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली आहे.

८. अनुसुचित वृक्ष प्रजातीमध्ये सद्या एकूण १५ प्रजातीचा समावेश आहे.

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ अंतर्गत अनुसुचित प्रजाती म्हणून असलेले वृक्षसुची खालीलप्रमाणे

अनुसुचीः-

हिरडा (Terminalia chebula), साग (Teak), महुआ, म्होवरा किंवा महु (Madhuka latifolia). आंबा (Mangifera indica) (कलमी आंबा व्यतिरिक्त), खैर (Acacia catechu), चंदन (Santalbum). बिजा (Pterocarpus marsupium), हळदू (Adina cordifolia), तिवस (Ougeinia da bergioides), ऐन (Terminalia tomentosa), किंजळ किंवा किंडळ (Terminalia Peniculata), अंजन (Hardwickia binata), जांभूळ (Syzijium cumini), खारफुटी (Mangrove), अमृता (नरक्या) (Nothopodytes nimmoniana/Nothopodytes foetida)

केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता जास्तीच्या अनुसुचित प्रजातीः-

शासन अधिसूचना क्रमांक टिआरएस-१०९७/प्र.क्र.२४४/फ-६, महसुल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम, १९६४ मधील अनुसूचित वृक्षांच्या यादीत केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता खालील प्रजातींचा समावेश करण्यात आलेला आहे.

शिशम (Dalbergia latifolia), शिवण (Gmelina arboria), माना (Lagerstroemia lanceolata), बेहळा (Terminalia belerica), काजरा (Strychnes nuxvomica), भेडस (Euginia zeylanica), अर्जुन सादळा (Terminalia arjuna)

१०. कास्तकाराकडुन वृक्षतोड परवानगीकरीता अर्ज वृक्ष अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालयात लेखी स्वरुपात किंवा संकेतस्थळावर प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम त्यास अर्ज प्राप्त झाल्याबाबतची पोच देण्यात येईल व संकेतस्थळावरील अर्जासोबत समाविष्ठ केलेले दस्तावेज व सादर केलेले मुळ दस्तावेज पडताळणीकरीता सात दिवसांचे कालावधी ठरविण्यात आलेले असून पडताळणी

मध्ये खालील बाबींचे समाधान करणे आवश्यक आहे. अ. अर्जदाराची मालकी संबंधीत शेत व वृक्षावर असल्याची खात्री करणे.

ब. अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र योग्य प्राधिकरणाकडुन जारी करण्यात आलेबाबत तपासणी

क. अर्जासोबत जोडलेले सर्व नकाशाची तपासणी करणे.

ख. सदर शेत संरक्षित वन/राखीव वने/झुडपी जंगल/खाजगी वने इत्यादी वनक्षेत्रामध्ये समाविष्ठ

नसल्याबाबत खात्री करणे.
ग. सदर क्षेत्राला लागून शासकीय क्षेत्र असल्यास तालुका निरीक्षक यांचेकडील सर्वेक्षण

नकाशाची तपासणी करणे.

घ. उक्त अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास वृक्ष अधिकारी सदर अर्ज नाकारुन संबंधीत अर्जदारांना कळवतील.

११. सदर शेत सर्वे नंबर शासकीय जमिनीला लागून असल्यास तालुका निरीक्षक यांनी जारी केलेले सर्वेक्षण नकाशानुसार वनसर्वेअर यांचेकडुन सिमा प्रतिबंधीत करणे. आवश्यक असल्यास तालुका निरीक्षक, भुमि अभिलेख कडुन नविन सर्वेक्षण निर्देशित करण्यासाठी १५ दिवसांत कालावधी देण्यात आलेला आहे.

१२. उक्त कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर वृक्ष अधिकारी सदर प्रकरणी सर्व दस्ताऐवज संबंधीत वनपाल यांचेकडुन तपासणी करुन अहवाल खालीलप्रमाणे प्राप्त करतील.

. अर्जासोबत सादर केलेले सर्व दस्ताऐवजास ७/१२ वरील नमुद वृक्षाची तपासणी अहवाल

अ ब. नकाशानुसार शेताची सिमांकणामधील झाडे नोंदणीनुसार बरोबर आहे याची खात्री केल्याचे

अहवाल.

क. अर्जासोबत जोडलेल्या वृक्षाची यादीनुसार प्रत्येक प्रजातीनुसार वृक्षाचे गोलाई बरोबर असल्याची खात्री करणे. तसेच अर्जामध्ये नमुद वृक्ष निर्जीव झाले असेल, रोगट झालेले असेल किंवा वा-याने पडलेले असेल किंवा वनसंवर्धनचा दृष्टीने पुर्णतावस्थेला पोहचले असेल किंवा नैसर्गिक कारणाने मोठी हानी झाली असेल किंवा कार्यक्षमरित्या लागवड करण्यास त्यामुळे अडथळा होत असेल, अशी नोंद घेणे.

ड. तोडीची परवानगी मागितलेले वृक्ष नाला/नदीच्या ३० मिटर परिसरात असल्यास जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्राची तपासणी करणे.

इ. तोडीची परवानगी मागितलेले वृक्ष एकरी २० पेक्षा कमी वृक्ष किंवा त्या समप्रमाणात शेतीसाठी अयोग्य जमीनीवर असल्यास जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्राची तपासणी करणे.

फ. तोडीची परवानगी मागितलेला शेताला लागून इतर कास्तकारांचे ना-हरकत प्रमाणपत्राची तपासणी करणे.

. सर्व मुद्दे मोका पंचनामासह तपासणी करणे. ह

१३. संबंधीत वनपाल उक्त तपासणी व कार्यवाही एकूण ८ दिवसांत पुर्ण करुन व अर्ज Online केलेल्या असल्यास संकेतस्थळावर उपयुक्त ठिकाणी upload करतील. सदर दस्तावेज व अहवाल २ दिवसांत वृक्षअधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करतील. यानंतर वनपाल यांचेकडुन प्राप्त अहवालावरुन स्थानिक लोकांचा माहिती करीता व तसेच संबंधीत ग्रामपंचायत यांचे ना हरकती करीता जाहीरनामा गामपंचायतीचा सुचनाफलकावर लावण्यात येईल व यांचे आक्षेपाकरीता १५ दिवसाची कालावधी ठरविण्यात आलेल्या आहे.

१४. वनपाल यांचेकडुन अनुकुल मिळालेल्या अहवाल व ग्रामपंचायतकडुन आक्षेप नोंदविण्यात आले नसल्यास वृक्ष अधिकारी आवश्यक असल्यास क्षेत्र निरीक्षण (१० दिवसात) करतील. क्षेत्र निरीक्षणात खालील बाबींविषयी शहनिशा करणे सुचविण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments