MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वनरक्षक: वन विभागाच्च्या पाठीचा कणा

वनरक्षक: वन विभागाच्च्या पाठीचा कणा


दिवसाची सुरुवात जंगल गस्त, कॅमेरा ट्रॅप, पाहणे.वाघाच्या हालचाली वर लक्ष ठेवणे,कुठे काही अवैद्य वृक्ष,शिकार व इतर वन गुन्हे होणार नाही यावर बारकाईने व कटाक्षाने लक्ष ठेवणारे  *वनरक्षक*..


शेत पिक नुकसान व पशु हानी झाल्यास गावातील लोंकाचा राग शांत करत त्याना समजावून नुकसान भरपाई साठी मोका पंचनामा करणारे  *वनरक्षक*..


वन्य जीवाच्या हल्यात मनुष्य हानी झाली तर स्वतः च्या जिवाची पर्वा न करता गंभीर  परिस्थीती नियंत्रित कशी करता येईल या साठी कर्तव्य बजावणारे  *वनरक्षक*..


वन वणवा लागला तर दिवस,रात्र,ऊन, गरमी पोटात अन्न आहे की नाही ह्या कडे लक्ष न देता वने व वन्य जीवांची रक्षा करण्या करिता वन वणवा विझणारे *वनरक्षक*..


जंगलात रक्षण करता करता कित्येक वेळा असे होते की अनेक दिवस किंवा अनेक महिने कुटुंबा पासून लांब राहून कर्तव्य बजावणारे *वनरक्षक*..


आज आपण सर्व सुखाने जीवन जगतो आहे (अन्न ,पाणी,व प्राण वायू) आपल्याला निरंतर मिळत आहे कारण आपले आदरणीय *वनरक्षक* जंगलात संरक्षण करत आहे.
*वनरक्षक* नसतील तर वने, वन्यजीव,व पर्याने सामान्य जनता धोक्यात येतील.


म्हणून अश्या माझ्या सर्व आदरणीय वने व वन्यजीवाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या प्रथम योंद्धा वनरक्षकांना मानाचा सलाम...

Post a Comment

0 Comments