MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री विकास गुप्ता व श्री एस जी टेंभुर्णीकर नियत वयोमानाने सेवानिवृत्त

राज्याचे  प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री विकास गुप्ता व श्री एस जी टेंभुर्णीकर सेवा निवृत्त 


Vikas Gupta IFS
विकास गुप्ता भावसे 

 श्री. विकास गुप्ता, भावसे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्या., नागपूर यांच्या दिनांक ३१.०७.२०२४ रोजीच्या नियत वयोमानाने सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ मर्या., नागपूर या पदाचा कार्यभार अतिरिक्त कार्यभार म्हणून श्री संजीव गौड, भावसे, मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन), महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्या., नागपूर यांच्याकडे पुढील आदेश होइपर्यंत सोपविण्यात यावा.असे आदेश मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) यांनी दिनांक 31.07.2024 रोजी दिले


S G Tembhurnikar  IFS
एस जी टेंभुर्णीकर भावसे 

त्याचप्रमाणे राज्यातील  वनविभागामध्ये सर्वांत मोठे पदावर असलेले .श्री. एस.जी. टेंभुर्णीकर, भावसे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख),महाराष्ट्र राज्य हे दिनांक ३१.०७.२०२४ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य या पदाचा कार्यभार पुढील आदेश होइपर्यंत अतिरिक्त कार्यभार म्हणून श्रीमती शोमिता विश्वास, भावसे, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (महाकॅम्पा), नागपूर यांच्यकडे सोपविण्यात यावा.असे आदेश मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) यांनी दिनांक 31.07.2024 रोजी दिले




Post a Comment

0 Comments