MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

माहिती अधिकार मध्ये अर्जदाराला द्यावयाची माहिती जन माहिती अधिकारी यांच्या सही शिक्यानिशी साक्षांकित करून देणे बाबत .. शासन निर्णय दिनांक. 19.12.2015

 माहिती अधिकार मध्ये अर्जदाराला द्यावयाची माहिती जन माहिती अधिकारी यांच्या सही शिक्यानिशी साक्षांकित करून देणे बाबत .. शासन निर्णय दिनांक. 19.12.2015 

परिपत्रक:-
माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मागविणान्या अर्जदारांना वेगवेगळ्या सार्वजनिक प्राधिकरणांकडून वेगवेगळ्या नमुन्यात माहिती उपलब्ध करून देण्यात येते. माहितीचे स्वरूप सर्वत्र वेगवगळे असल्याने आणि सार्वजनिक प्राधिकरणांसाठी त्याबाबत विहित नमुना तयार करणे शक्य नसल्याने सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती उपलब्ध करून देताना त्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असाव्यात याबाबत स्पष्टता करणारे परिपत्रक केंद्र शासनाच्या परिपत्रक क्र.१०/१/२०१३-आय आर दि.६.१०.२०१५ अन्वये निर्गमित करण्यात आल्या असून त्यातील बाबी सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणण्याचे सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व विभागांना सूचित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुसार शासन पुढीलप्रमाणे सूचित करीत आहे. २. माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती उपलब्ध करून देताना त्यामध्ये सर्वसाधारणपणे खालील बाबी समाविष्ट असाव्यात.
(१) माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जाचा क्रमांक व दिनांक आणि संबंधीत सार्वजनिक प्राधिकरणात सदर अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक. (२) संबंधीत जन माहिती अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, पत्ता, अधिकृत दुरध्वनी क्रमांक आणि ई-मेल नमूद करण्यात यावा.
(३) मागणी केलेली माहिती नाकारण्यात आलेली असल्यास, माहिती अधिकार अधिनियम, २००५ चे संबंधीत कलम उधृत करण्यासह माहिती नाकारण्याची सविस्तर कारणमिमांसा नमूद करावी.
(४)माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६ (३) अन्वये माहिती अधिकार अर्ज अन्य
सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येत असल्यास, ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे सदर अर्ज हस्तांतरित करण्यात येणार आहे त्या प्राधिकरणाची सविस्तर माहिती नमूद करावी.
(५) माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती अर्ज उत्तरित करताना त्यामध्ये प्रथम अपील अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, पत्ता, अधिकृत दुरध्वनी क्रमांक आणि ई मेल नमूद करण्यात यावा, तसेच उत्तराच्या शेवटच्या परिच्छेदात "जन माहिती अधिकाऱ्याचे पत्र प्राप्त झाल्यापासून ३० दिवसात प्रथम अपील दाखल करण्यात यावे" असे स्पष्टपणे नमूद करावे.
(६) माहितीच्या अधिकारांतर्गत पत्रव्यवहार करताना, सर्व जन माहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांनी त्यांच्या स्वाक्षरीखाली त्यांचे नाव, पदनाम तसेच विभागाचे नाव ठळकपणे नमूद करावे.
३. माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये अर्जदाराने माहिती साक्षांकीत करून मागीतलेली असल्यास संबंधीत जन माहिती अधिकाऱ्याने ती माहिती साक्षांकीत करून तसे माहितीवर नमूद करून माहिती उपलब्ध करून द्यावी, उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कागदपत्राची/अभिलेखाची संख्या मोठी असल्यास माहितीचे साक्षांकन आवश्यकता असल्यास त्याच्या कनिष्ठ राजपत्रित अधिकान्यास करता येईल. साक्षांकन पुढीलप्रमाणे नोंदविण्यात यावे.
माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कागदपत्राची/अभिलेखाची सत्यप्रत.
सही व दिनांक/- 
संबंधीत जन माहिती अधिकाऱ्याचे 
तसेच सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव (ठसा).
उपरोक्त परिपत्रकातील तरतूदी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, सार्वजनीक प्राधिकरण तसेच सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व तदनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात यावे,
4 सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक क्र. २०१५१२१९१२२८०९०००७ असा आहे. हे
परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
नावाने

Post a Comment

0 Comments