वनविभागातील / वनविकास मंडळातील विविध कार्यालय विश्रामगृह निर्वचन केंद्र वनविद्यालय / महाविद्यालय इथे असलेल्या मृगचिन्हाबाबत...शासन पत्र दिनांक 17.06.2015
January 18, 2024
वनविभागातील / वनविकास मंडळातील विविध कार्यालय विश्रामगृह निर्वचन केंद्र वनविद्यालय / महाविद्यालय इथे असलेल्या मृगचिन्हाबाबत...शासन पत्र दिनांक 17.06.2015
उपरोक्त विषयावरील आपल्या संदर्भीय पत्रान्वये आपण व्यक्त केलेले धारणेबाबत विधी व न्याय विभागाचे मत घेतले असता आपली धारणा योग्य असल्याचे त्यांनी अभिमत दिले आहे. सोबत अभिमताची छायांकित प्रत जोडली आहे. सबब, यापुढे शासन संपत्ती म्हणून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या मृगयाचिन्हांचे वनविभाग कार्यकारी प्राधिकारी आणि नैसर्गिक देखरेख करणारे असल्याने, वनविभागाला त्यांच्या ताब्यातील मृगयाचिन्हांबाबत वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 40 अन्वये घोषित करुन कलम 42 अन्वये मालकी प्रमाणपत्र जारी करण्याची आवश्यकता नाही. सदर बाब ही आपल्यास्तरावरुन सर्वसंबंधितांना कळवावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे. Tag
वन विभागाच्या ताब्यात असलेल्या मृगयाचिन्ह बाबत शासन निर्णय | वन्यजीव मृगयाचिन्ह शासन निर्णय | वन्यप्राणी मृगयाचिन्ह शासन निर्णय| प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे परिपत्रक | वन विभाग शासन निर्णय| वन्यजीव शासन निर्णय| वन्यजीव संरक्षण अधिनियम मराठी pdf | वन्यजीव मृगयाचिन्ह नियम pdf | Wildlife Trophy Rule pdf | Wild animal Trophy Rule pdf
0 Comments