MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्यता) कायदा २००६ मधील तरतूदीनुसार गौण वनोपजांचा वाहतूक परवाना देण्याच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत. PCCF यांचे परिपत्रक. दिनांक. 01.11.2014

 

 वनहक्क कायद्याअंतर्गत गौण वनोपजांच्या चाहतूक परवाना देणेसंदर्भात सविस्तर कार्यप्रणाली व वाहतूक परवान्याचा मसूदा शासनाने शासन निर्णय संदर्भ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ २ अन्वये निर्गमित केला. त्यातील सुचनांप्रमाणे आवश्यक कार्यवाही करणेस्तव या कार्यालयाचे पत्र संदर्भ ३ अन्वये सर्व वनवृत्तांना सुचना दिलेल्या आहेत,

मुख्य वनसंरक्षक (प्रा.), अमरावती यांनी त्यांचे पत्र संदर्भ ४ अन्वये (प्रत सोबत जोडली आहे) महाराष्ट्र वन नियमावली २०१४ च्या नियम ३२(१) (d) अनुसार प्राप्त शक्तीचा वापर करून संबंधीत ग्रामसभेस वाहतूक परवाना जारी करण्यास त्यांचे अधिनस्त उपवनसंरक्षक (प्रा.) यांना प्राधिकृत केले आहे. सदर प्राधिकरण दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अंगलात राहील, असेही सदर पत्रात नमुद आहे. तसेच उपवनसंरक्षक यांनी संबंधीत ग्रामसभेस वाहतूक परवाना प्रदान कण्याबाबत महाराष्ट्र वन नियमावली २०१४ च्या नियम ३२(१) (d) अंतर्गत द्यावयाचा आदेशाचा नमुना सहपत्रीत केला आहे.

मुख्य वनसंरक्षक (प्रा.). अमरावती यांनी निर्गमित केलेल्या मसुद्यास व अवलंबलेल्या कार्यपध्दतीस या कार्यालयाची सहमती आहे. संपूर्ण राज्यात याबाबत एकसूत्रता राहावी म्हणून मुख्य वनसंरक्षक (प्रा.), अमरावती यांनी अवलंबलेली कार्यपध्दती व मसूदा सर्व वनवृत्तांनी वापर करून अंमलात आणावा. तथापी महाराष्ट्र वन नियमावली २०१४ च्या नियम ३२(१)(d) मधील परंतकातील तरतुदी नुसार मोहा फुलाचे विशिष्ट क्षेत्रातून वाहतुकीचे बाबतीत मुख्य वनसंरक्षकांनी आयुक्त, उत्पादन शुल्क यांचेशी विचार विनिमय करून, स्थानिक उत्पादन शुल्क अधिकारी, जो उपनिरीक्षक या दर्जापेक्षा खाली नसेल त्यांनाच प्राधिकृत करावे व वनहक्क कायद्याअंतर्गत गौण वनोपजाकरीता जो शासन मान्य वाहतूक पासचा नमूना आहे त्य नमुन्याची पुस्तकेही आवश्यकतेप्रमाणे उत्पादन शुल्क विभागास उपलब्ध करून द्यावीत, मोहा फुलांचे वाहतुकीकरीता उपरोक्त तरतूद सर्व ग्रामसभेच्याही निदर्शनास आणून द्यावी.
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्यता) कायदा २००६ मधील तरतूदीनुसार गौण वनोपजांचा वाहतूक परवाना देण्याच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत. PCCF यांचे परिपत्रक. दिनांक. 01.11.2014 

Post a Comment

0 Comments