निलंबित कर्मचारी -निर्वाह भत्त्याच्या दराचे पुनर्विलोकन
निलंबन काळातील निर्वाह भत्ता व पूरक भत्ते या सम्बन्धित तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी , स्वीयेतर सेवा आणि निलंबन. बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने ) नियम १९८१ च्या नियम ६८ व ६९ मध्ये केलेल्या आहेत.
निलंबित कर्मचारी , अर्ध वेतनी रजेवर असता तर त्याला जितके रजा वेतन मिळाले असते, त्या रजा वेतनाइतकी रक्कम आणि त्याव्यतिरिक्त त्याला अशा रजा वेतनावर आधारलेला महागाई भत्ता मिळतो. म्हणजेच सर्वसाधारण पणे कर्मचा-यास अर्ध वेतना इतकी रक्कम निर्वाह भत्ता म्हणून मिळते . तसेच सदर रकमेवर महागाई भत्ता देखील देय असतो.
जर कालावधी काही कारणाकरिता वाढला आणि त्या कारणांशी कर्मचा-याचा संबध नसला तर पहिल्या ३ महिन्यानंतर अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याच्या रकमेत जास्तीत जास्त ५० टक्के करता येते अशी स्पष्ट तरतूद नियमात केलेली आहे
अशी वस्तुस्थिती असली तरी अनेक प्रकरणात .निलंबन कालावधी ३ महिन्याहून अधिक झाला तरी निर्वाह भत्त्याचे पुनर्विलोकन केले जात नाही अस आढळून येते.. या संबधात वित्त विभागाने काढलेले दि. १०-१२-१९८१चे परिपत्रक काढलेले आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments