संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे डी.एन.ए. चाचणी प्रयोगशाळा उभारण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांकः डब्ल्यूएलपी- ०९१८/प्र.क्र.३४८/फ-१
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- २० मार्च, २०१९
वाचा :-
१. शासन निर्णय क्रमांक-डब्लूएलपी-१०/२०००/प्र.क्र.५७/फ-१, दिनांक २९.११.२००३.
२. शासन निर्णय क्रमांक- डब्लूएलपी- १०११/प्र.क्र.२६६/फ-१, दिनांक २९.११.२०११.
३. शासन निर्णय क्रमांक- डब्लूएलपी-१०११/प्र.क्र.२६६/फ-१, दिनांक १६.०८.२०१३.
४. शासन निर्णय क्रमांक- डब्लूएलपी-०८१६/प्र.क्र.२४५ /फ-१, दिनांक १२.०८.२०१६. ५. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-
२२(६)/योजना/प्र.क्र.९०/२००८/२०१८-१९, दिनांक:- ३०.०८.२०१८..
६. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-२२(६)/ योजना/प्र.क्र. ९० / ४१५४/१८-१९, दिनांक :- २०.०२.२०१८.
प्रस्तावना:-
मनुष्य वन्यप्राणी संघर्ष विशेषतः मनुष्य मृत्युचे सततच्या घटनेच्या वेळी कारणीभूत प्राण्याला ओळखून त्याला जेरबंद करणे अत्यंत महत्वाचे असते. सदर वन्यप्राण्याची ओळख पटविण्याकरिता पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके/पटयांचा वापर केला जात होता. आता प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता प्राण्यांची डी.एन.ए. ( DNA )चाचणी करणे आवश्यक ठरले आहे. सद्यस्थितीत डी. एन. ए. चचणी करीता नमुने (Lacones) हैद्राबाद व भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादून यांचेकडे पाठविले जातात. सदर चचणीचे परिणाम मिळण्याकरिता अनेक महिने वाट पहावी लागते. दरम्यान कारणीभूत प्राण्याची तंतोतंत ओळख निश्चित न झाल्याने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ११ व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर प्राण्याला जेरबंद करण्याचे आदेश काढण्यास अडचण निर्माण होते. डी. एन. ए. चाचणीचे परिणाम लवकर प्राप्त व्हावे याकरिता वन विभागात स्वतंत्र डी.एन.ए. चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे..
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली ( SGNP ) येथे प्रयोगशाळा चालविण्याकरीता इमारत उपलब्ध आहे. प्रयोगशाळा चालविण्याकरिता मुंबई शहरात उपलब्ध असलेले तज्ञ मनुष्यबळ व वाहतुकीची सोय लक्षात घेता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, National Park बोरीवली येथे डी. एन. ए. चाचणी प्रयोगशाळा उभारण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती..
शासन निर्णय :-
१. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे डी.एन.ए. चाचणी प्रयोगशाळा स्थापित करणेस शासनाची मान्यता देण्यात येत आहे..
२. सदर प्रयोगशाळा चालविण्याकरीता लागणारे आवर्ती खर्च (उदा. उपकरणाचे परीरक्षण, औषधे व रिएजन्टस कन्झ्यूमेबल्स इ.) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली चे स्वीय प्रपंची लेखा मधून भागविण्यात यावे.
३. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्वीय प्रपंची लेखा खात्यातील सर्व बाबी व तपशील महालेखापाल कार्यालयाच्या निदर्शनास आणून त्यांचे स्पष्ट अभिप्राय तसेच मान्यता घेणे अनिवार्य राहील.
४. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्वीय प्रपंची लेखा खात्याच्या व्यवहाराचे ताळमेळ (reconciliation) व परिक्षण करण्याची जबाबदारी मुख्य वनसंरक्षक तथा संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांची राहील.
५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. आनस-२०१९/१२२/कोषा. प्रशा दि. १२.०३.२०१९ ला अनुलक्षून निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१९०३२०१७२३३५८९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय
0 Comments