व्हॉट्सअॅपवरून नोटिसा पाठवणे अवैध. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
भारतीय नागरिक संहिता, २०२३च्या कलम ३५अंतर्गत, पोलिसांनी केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या पद्धतीनुसारच नोटिसा पाठवाव्यात, अशा सूचना पोलिसांना द्याव्यात, असे निर्देश न्या. एम. एम. सुंद्रेश आणि न्या. राजेश बिंदार यांच्या खंडपीठाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना २१ जानेवारी रोजी दिले. 'व्हॉट्सअॅप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे नोटीस देणे, हे फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय नागरिक संहिता, २०२३अंतर्गत मान्यताप्राप्त पद्धतीचा पर्याय म्हणून मान्य केले किंवा ओळखले जाऊ शकत नाही,' असेही सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे.
WhatsApp notice /

0 Comments