वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ अंतर्गत संरक्षित असलेले सागरी जीव मासेमारीच्या जाळ्यात अडकल्यास, जाळे कापून त्यांना सोडल्याबद्दल मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या भरपाईची विशेष योजना.
महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध किनारपट्टी क्षेत्रात ‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ मध्ये समाविष्ट असलेल्या अनेक सागरी प्रजाती आढळतात. यामध्ये निळा देव मासा, ब्रुडीज देवमासा, डॉल्फिन, करवत मासा, व्हेल शार्क, सागरी कासवे या प्रजातींचा समावेश आहे. काहीवेळा या संरक्षित प्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्या जातात. प्रसंगी जाळे कापून या संरक्षित जीवांना पुन्हा समुद्रात सुरक्षितरित्या सोडल्यास मच्छिमारांना कापलेल्या जाळ्याची भरपाई म्हणून या योजनेअंतर्गत कमाल २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.
संयुक्तरित्या दिली जाणारी ही नुकसान भरपाई योजना (शासन निर्णय क्र. मत्स्यवि- १११८/प्र.क्र.७५/पदुम-१४, दि. २१/१२/२०१८) कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग यांनी सुरू केली आहे.
संदर्भ
कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान

0 Comments