MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

राज्य माहिती आयोगातील प्रत्यक्ष, ऑनलाईन किंवा Hybrid इत्यादी कोणत्याही प्रकारच्या सुनावणीदरम्यान कोणालाही Video Recording करता येणार नाही. याबाबत कार्यालयीन आदेश दिनांक 20.10.2023

महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, 

मुख्यालय १३ वा मजला, नविन प्रशासकीय इमारत,

 मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०० ०३२. फॅक्स क्र. ०२२-२२०४९३९०.

website: sic.maharashtra.gov.in.

                                     कार्यालयीन आदेश

                                    दिनांक : २०.१०.२०२३


माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम १५ (४) अन्वये, राज्य माहिती आयोगाच्या कामकाजाचे सर्वसाधारण अधीक्षण, संचालन व व्यवस्थापन हे राज्य मुख्य माहिती आयोगाकडे निहित असेल व त्याला राज्य माहिती आयुक्त सहाय्य करतील आणि राज्य माहिती आयोगाला या अधिनियमाखाली कोणत्याही इतर प्राधिकरणाच्या निदेशांना अधीन न राहता, स्वायत्तपणे वापरता येत असतील असे सर्व अधिकार वापरता येतील आणि करता येत असतील अशा सर्व कृती व गोष्टी करता येतील.

राज्य माहिती आयोगाच्या अपील सुनावणीदरम्यान काही वेळा अपिलार्थीकडून सुनावणीचे Video Recording करण्याची मागणी करण्यात येते. राज्य माहिती आयोगाच्या दिनांक ०६/१०/२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सुनावणीदरम्यान कोणालाही Video Recording करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने माहिती अधिकार कलम १५ (४) अन्वये खालील आदेश पारित करण्यात येत आहेत.:-

१) राज्य माहिती आयोगातील प्रत्यक्ष, ऑनलाईन किंवा Hybrid इत्यादी कोणत्याही प्रकारच्या सुनावणीदरम्यान कोणालाही Video Recording करता येणार नाही.

२) राज्य माहिती आयोगांमधील सुनावणीदरम्यान कोणीही Video Recording करताना निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमांप्रमाणे योग्य तो प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.

२. कार्यालयीन आदेश मा. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.


(सविता जावळे)

सचिव, राज्य मुख्य माहिती आयोग, मुंबई



Post a Comment

0 Comments